HW News Marathi
महाराष्ट्र

‘येस बँके’चे माजी सीईओ राणा कपूरच्या मुलीला विमानतळावर रोखले

मुंबई। येस बँकेचे माजी संस्थापक राणा कपूर यांची मुलगी रोशनी कपूरला मुंबई विमानतळावर मुंबई पोलिसाने रोखले आहे. रोशनी कपूर ही ब्रिटीश एअरवेजमधून लंडनला जात होती. मात्र, रोशनी ला मुंबई विमानतळावर रोखण्यात आले आहे. यानंतर आता राणा कपूर यांच्या कुटुंबाविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आले आहे. येस बँक गैरव्यवहार प्रकरणात राणा कपूर कपूर यांच्यावर ईडीने मनी लॉन्ड्रिंग कायद्यातंर्ग गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी ईडीने शनिवार (७ मार्च) रात्रीपासून राणा कपूर यांची चौकशी करण्यास सुरुवात केली. ईडीने राणा कपूर यांची तब्बल ३१ तासाच्या चौकशीनंतर त्यांची अटक केली आहे. कपूर यांच्यावर ईडीने मनी लॉन्ड्रिंग कायद्यातंर्ग गुन्हा दाखल केला आहे. यानंतर काल (८ मार्च) मुंबईतील विशेष सुट्टीकालीन न्यायालयाने कपूर यांना ११ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, येस बँक गैरव्यवहार प्रकरणी राणा कपूर यांच्यासोबतच त्यांची पत्नी बिंदू कपूर, मुलगी राखी कपूर टंडन, राधा कपूर आणि रोशनी कपूर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध ईडीने लूकआउट नोटीस बजावली. यानंतरही राणा कपूर यांच्या मुलगी रोशीन कपूर देश सोडून लंडनला पळून जात होती. मात्र, ब्रिटिश एअरवेजने लंडनला निघालेल्या रोशनीला मुंबई पोलिसांनी रोखले.राणा कपूर यांनी अधिकारात नियमबाह्य कर्ज वाटप केल्याचे माहिती समोर आली आहे. कर्ज वाटप करणे आणि ते वसूल करण्याची प्रक्रियाही त्यांनी ठरवली. आपल्या वैयक्तिक संबंधातून अनेकांना कर्ज वाटप केल्याचेही उघड झाले. एसबीआयने देखील येस बँकेच्या कर्जवितरण धोरणावर संशय उपस्थित केला.

आरबीआयचे येस बँकेवर निर्बंध

दरम्यान, रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर ५ मार्चला अर्थमंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार निर्बंध आणले. यानुसार येस बँकेच्या खातेदारांना आता केवळ ५० हजार रुपयेच काढता येणार आहेत. येस बँकेवरील हे निर्बंध ३ एप्रिलपर्यंत हे निर्बंध लावण्यात आले आहेत. शिक्षण, आरोग्य आणि लग्न असेल तरच अधिक रक्कम काढण्याची मुभा आहे. बँकेच्या ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीला पाहता आरबीआय ने हा निर्णय घेतला आहे. तसेच, एसबीआयचे माजी मुख्य आर्थिक अधिकारी प्रशांत कुमार यांना येस बँकेचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या…शिंदे सरकारने आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ निर्णय

Aprna

‘बाळासाहेब म्हणाले, सेना सोडली नसती तर मुख्यमंत्री….’

News Desk

गृहविभाग हा नेहमीच चॅलेंजिंग राहिला आहे ! गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Gauri Tilekar