HW News Marathi
देश / विदेश

खुशखबर ! ‘येस बँके’च्या खातेदारांना कोणत्याही एटीएममधून पैसे काढता येणार

मुंबई | येस बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामुळे आरयबीआयने येस बँकेवर निर्बंध लादले. या निर्बंधानुसार बँकेतून ५० हजार रुपये काढण्याची मुदत दिली होती. यानंतर खातेदारांनी बँकेच्या बाहेर लांबच्या लांब रांगला लागल्या होत्या. या पार्श्वभूमीवर बँकेच्या खातेधारकांना कुठल्याही बँकेच्या एटीएममधून रोख रक्क काढता येणार आहे, असे एक पत्रक येस बँकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. यासंदर्भात येस बँकेने ट्वीट करत माहिती दिल्याने खातेधारकांचा जीव भांड्यात पडला आहे.

दरम्यान, बँकेचे संस्थापक आणि माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांची काल (८ मार्च) रात्रीपासून तब्बल ३१ तास कसून चौकशी केल्यानंतर आज (८ मार्च) पहाटे त्यांना अटक करण्यात आले. कपूर यांच्यावर ईडीने मनी लॉन्ड्रिंग कायद्यातंर्ग गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील विशेष सुट्टीकालीन न्यायालयाने कपूर यांना ११ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.

आरबीआयने येस बँकेच्या संचालक मंडळाला ३० दिवसांसाठी निलंबित केले आहे. तसेच स्टेट बँकेचे माजी अधिकारी प्रशांत कुमार यांनी बँकेचे प्रशासक म्हणून कार्यभार हाती घेतला आहे. ईडीच्या चौकशीदरम्यान कपूर यांनी अनिल अंबानी ग्रुप, आयएल अँड एफएस, सीजी पॉवर, एस्सार पॉवर, रेडियस डेव्हलपर्स आणि मंत्री ग्रुप आदी कंपन्यांना शेकडो कोटींची कर्जे नियमबाह्य पद्धतीने दिल्याचा आरोप आहे. यामुळे २०१७ मध्ये राणा यांनी जवळपास ६३५५ कोटींची कर्ज वाटप केल्याचे उघड झाले आहे. कपूर यांना काल दुपारी बॅलॉर्ड इस्टेट येथ असलेल्या ईडी कार्यालयात आणण्यात आले होते.

आरबीआयचे येस बँकेवर निर्बंध

दरम्यान, रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर ५ मार्चला अर्थमंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार निर्बंध आणले. यानुसार येस बँकेच्या खातेदारांना आता केवळ ५० हजार रुपयेच काढता येणार आहेत. येस बँकेवरील हे निर्बंध ३ एप्रिलपर्यंत हे निर्बंध लावण्यात आले आहेत. शिक्षण, आरोग्य आणि लग्न असेल तरच अधिक रक्कम काढण्याची मुभा आहे. बँकेच्या ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीला पाहता आरबीआय ने हा निर्णय घेतला आहे. तसेच, एसबीआयचे माजी मुख्य आर्थिक अधिकारी प्रशांत कुमार यांना येस बँकेचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Kulbhushan Jadhav : दुसऱ्यांदा काउन्सलर अ‍ॅक्सेसला पाकचा नकार, भारत आयसीजेमध्ये जाणार

News Desk

चिराग पासवान यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे करण्यासाठी लोजप नेते उत्सुक

News Desk

ऊँ च्या प्रतिमेने बनवला जागतिक विक्रम

News Desk