मुंबई। कोरोना पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील शाळांची घंटा कानावर ऐकू येत नव्हती, अर्थातच शाळाही बंद होत्या. मात्र आता पहिली ते बारावीपर्यंतची शाळा सुरु करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. त्यानंतर आज महाविकास आघाडी सरकारनं शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. प्राथमिक शाळा ऑफलाईन पद्धतीनं सुरु करण्याचा प्रस्ताव शाळेल शिक्षण विभागानं मांडला होता. त्याला आज राज्य सरकारनं मान्यता दिलीय. दरम्यान, शाळा सुरु होत असताना कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन नियमावली पाळण्याचं आवाहन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलंय.
मा.मुख्यमंत्री,मंत्रिमंडळ व पीडियाट्रिक टास्क फोर्स यांच्याशी चर्चा केल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने १ डिसेंबरपासून ग्रामीण भागात इ.१ली ते ४थी व शहरी भागात इ.१ली ते ७ वीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यातील शाळा सुरक्षितपणे सुरू करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) November 25, 2021
शिक्षकांसाठीच्या सूचना
1) कोरोनाची परिस्थिती सर्वसामान्य झाली की खेळ सुरु करायला हरकत नाही तरीही असे खेळ खेळत असताना आवश्यक ती काळजी घ्यावी.
2) शिक्षकांसाठीही महत्वाच्या सूचना
जेवण व इतर बाबी केल्यानंतर साबणाने किंवा सॅनिटायजरे हात धुण्याची विद्यार्थ्यांना आठवण करुन द्यावी.
3) वह्यांची अदलाबदल होणार नाही यासाठी गृहपाठ ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यास सांगावं.
4) वेळ असल्यास शक्यतो गृहपाठ वर्गातच करुन घ्यावा.
5)सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही प्रकारचे खेळ घेण्यात येऊ नयेत.
6)खेळाचं साहित्य सॅनिटाईज करावं.
खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांकडे विशेषकरुन दमलेल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावं.
पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी नियम
1) ज्या शाळांमध्ये खासगी वाहनांनी विद्यार्थी येतात त्या वाहनात एका सीटवर एक विद्यार्थी प्रवास करेल याची काळजी घ्यावी.
2) मुलांना शाळेत चालत येण्यासाठी प्रोत्साहन द्यावं
3) विद्यार्थी बसमध्ये चढताना आणि उतरताना चालक आणि वाहकांनी विद्यार्थ्यांना सॅनिटायझरचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करावं
टास्क फोर्सने परवानगी दिली
मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज ग्रामीण भागात पहिली ते चौथीचे वर्ग सुरू होणार आहे. यापूर्वी ग्रामीण भागात पाचवी ते बारावी वर्ग सुरू झाल्या होत्या. तसेच शहरी भागात पहिली ते सातवी शाळा सुरू करण्यास चाईल्ड टास्क फोर्सने परवानगी दिली. गेल्या अनेक दिवसांपासून चाइल्ड टास्क फोर्सची चर्चा सुरू होती. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्स यांच्याशी चर्चा करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे गायकवाडांनी सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.