HW News Marathi
देश / विदेश

‘प्रवीण तू चॅम्पियन, जपान गाजवून ये’, साताऱ्याच्या तिरंदाजाशी मोदींनी मराठीतून संवाद

नवी दिल्ली | कोरोनाच्या परिस्थिती मध्ये लोकांना मनोरंजन हे खूप महत्वाचं ठरलं. मनोरंजनासोबत खेळ पाहायलाही लोकांना आवडतं. लवकरच टोक्यो ऑलम्पिक स्पर्धांना जपानच्या टोक्यो शहरात सुरुवात होणार आहे. या स्पर्धांसाठी सर्व देश आपले आघाडीचे खेळाडू पाठवत आहेत. भारताचे शिलेदारही टोक्यो ऑलम्पिकसाठी १७ जुलैला रवाना होणार आहेत. संपूर्ण भारत खेळाडूंना शुभेच्छा देत आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सीगद्वारे खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्राचा तिरंदाज प्रवीण जाधवशी बोलताना मोदीजींनी चक्क मराठीत त्याची विचारपूस केली आहे.

मोदींनी साधला मराठीतून संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलम्पिक स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येकाशी संवाद साधला. मराठमोळ्या प्रवीणशी व

त्याच्या मातापित्यांशी त्यांनी यावेळेसमराठीतून संवाद साधला मोदी यांनी प्रवीणशी संवादाची सुरुवातच मराठीतून केली ते म्हणाले, ”प्रवीणजी नमस्ते, काय कसं काय?”. त्यानंतर मोदीजींनी पहिलाच प्रश्न त्याला विचारला की, ”तू आधी अॅथलिटिक्स करत होतास मग आता अचानक तिरंदाजी स्पर्धेत ऑलम्पिकसाठी निवडला गेला आहेस. हा बदलाव कसा झाला?’ यावर खुलासा करताना प्रवीणने सांगितले. त्याचं सुरुवातीला राज्य पातळीवर ऐथ्लेटिक स्पर्धेसाठी सिलेक्शन झालं होतं. पण त्याची प्रकृती ऐथ्लेटिकसाठी योग्य नसल्याने त्याला त्याच्या प्रशिक्षकाने वेगळा कोणतातरी खेळ खेळण्याचा सल्ला दिला. त्यानंतर प्रवीणने तिरंदाजीचा सराव सुरु केला आहे.

प्रवीणचे पालक खरे चॅम्पियन

प्रवीणने मोदीजींशी संवाद साधताना त्याच्या घरच्या परिस्थितीबाबत सांगितले. आई-वडिलांप्रमाणे मजदूरी करु लागू नये यासाठी मेहनत घेऊन मी या खेळात स्वत:ला तरबेज बनवलं असं प्रवीणने सांगितल. यावेळी मजदूरी करतही मुलाला इतका उत्कृष्ठ तिरंदाज बनवल्याने ‘प्रवीण तू तर चॅम्पियन आहेसच तुझे आई-वडीलही चॅम्पियन आहेत.’ असं मोदीजी म्हणाले. तसेच प्रवीणच्या वडिलांशी संवाद साधताना त्यांनी ‘प्रकृती बरी आहे का? असं मराठीत विचारलं ज्यावर प्रवीणच्या वडिलांनी देखील हो बरी आहे असं उत्तर दिलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या षडयंत्राला व गोदी मीडियाच्या दबावाला सरकारने बळी पडू नये !

News Desk

मानहानी प्रकरण: राहुल गांधींना जामीन मंजूर; पुढील सुनावणी 13 एप्रिलला होणार

Aprna

बेस्ट टॉयलेट पेपर सर्च करताच पाकिस्तानचा झेंडा, गुगल म्हणते आमचा दोष नाही

News Desk