HW News Marathi
महाराष्ट्र

दानवे विरोधात शिवसैनिकांनी केले ” जोडे मारो आंदोलन “

भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला भर चाैकात मारले शिवसैनिकांनी

उत्तम बाबळे / महेश जोशी

नांदेड :- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतक-यांविषयी नुकतेच बेताल वक्तव्य करुन तमाम शेतक-यांच्या भावना दुखविल्या,या वक्तव्या बद्दल भोकर आणि धर्माबाद येेेेथे शिवसेनेच्या वतीने तीव्र जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चाैकात दानवे यांच्या प्रतिमेला चप्पल व जोडे मारुन ” जोडे मारो आंदोलन केले आहे.

भोकर तालुका शिवसेना प्रमुख सतिश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तालुका शिवसेनेच्या वतीने ११ मे २०१७ रोजी सकाळी ११:३० वाजता डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चाैक,भोकर येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नुकतेच जालना येथे शेतक-यांविषयी बेताल वक्तव्य केल्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी ” जोडे मारो आंदोलन ” केले.दानवे यांच्या प्रतिमेला शिवसैनीकांनी भर चाैकात जोडे,चप्पल ने मारुन जाहीर निषेध व्यक्त केला.यावेळी झालेल्या आंदोलनात ता.प्र.सतिश देशमुख,उप ता.प्र.तथा सरपंच संघटनेचे अध्यक्ष सुनिल चव्हाण,माजी ता.प्र.प्रदिप दाैलतदार,नारायण पाटील सोमनाळकर,शहर प्रमुख माधव जाधव पाटील,शहर संघटक सुनिल जाधव,श.उ.प्र.श्याम वाघमारे,जुगनू आलेवाड,वामन पर्वत,हनमंत कदम,संभाजी देशमुख,मारोची पवार,पांडूरंग वर्षेवार,बाळू चिंताकुटे,दासा चितोळे,राजू पोगरे,राजू मोरे,परमेश्वर राव यासह आदी शिवसैनिकांनी सहभाग घेतला.

धर्माबाद येथे शिवसैनिकांनी केले जोडे मारो आंदोन

रावसाहेब दानवेयांनी शेतक-यांविषयी नुकतेच बेताल वक्तव्य करुन तमाम शेतक-यांच्या भावना दुखविल्या, यावक्तव्या बद्दल धर्माबाद येेेेथे शिवसेनेच्या वतीने तीव्र जाहीर निषेध करत जोडे मारो आंदोन केले या आंदोनात शिवसेनेचे तालुका अध्यक्ष गणेश गिरी ,माजी शहर अध्यक्ष गणपत कात्रे, पंचायत समिती सदस्य मारोती कागेरू, माजी तालुका अध्यक्ष तथा सरपंच संघटनेचे अध्यक्ष बाबुराव पाटील बाभळीकर, गोविंद देशाई, शिवराज पाटील मोकलीकर, आशोक रामोड, आनिल कमलाकर, दिगंबर जगदंबे, शंकर आवरे गौराजी विभुते आदिच्या नेतृत्वाखाली आंदोन करण्यात आले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तासाभरात कर्मचाऱ्यांना मिळणार २ महिन्यांचा पगार  आणि दिवाळी बोनस – अनिल परब

News Desk

काँग्रेसची विचारधारा देशाला जोडणारी तर भाजपा अन् RSS ची विभाजनवादी!

News Desk

जे भाजपच्या पोटात ते कंगणाच्या मुखात! – बाळासाहेब थोरात

News Desk