HW News Marathi
महाराष्ट्र

माजी मंत्री गावितांनी निवडणूक आयोगापासून लपविली माहिती

 

निवडणूक आयोगाकडे तक्रार

Gavit Election Complaint

महाराष्ट्रातील नंदुरबार(अ.ज.) विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपाचे आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी उमेदवारी अर्ज सादर करताना दायित्वा अंतर्गत शासकीय देणीबाबत माहिती दडविल्याचा आरोप करत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी यांस तक्रार दाखल केली आहे. गावित यांनी मंत्री पद सोडल्यापासून शासकीय दंडाची तब्बल 44 लाख रक्कम अदा केली नसल्याचा आरोप त्यांसवर आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांस केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की वर्ष 2014 च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगास सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात शासकीय देणीच्या माहितीत निरंक असा शब्द लिहिला आहे. प्रत्यक्षात त्यांस 20 मार्च 2014 रोजी मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर शासकीय निवासस्थान ‘सुरुचि’ रिक्त केला नाही. 25 सष्टेंबर 2014 रोजी निवडणूक प्रतिज्ञापत्रात गावितांनी सदनिकापोटी देय रक्कमेच्या माहितीच्या रकान्यापुढे निरंक असा शब्द लिहिला. मंत्रिपदावरुन वगळल्यानंतर ते निवडणूक अर्ज सादर करेपर्यंत गावितांनी निवासस्थान सोडले नाही ना देणी अदा केली नाही. दायित्वा अंतर्गत शासकीय देणी असताना त्याचा उल्लेख न करता ती माहिती दडविल्याचा आरोप गलगली यांनी करत गावितांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. या तक्रारीची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांस सुद्धा केली आहे. यासंदर्भात डॉ. गावित यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यावर परिवहन मंत्री राजी तर पुन्हा होईल चर्चा!

News Desk

उपमुख्यमंत्र्यांना वाटतं त्यांच्या दौऱ्याने आम्हाला दौरे पडतील – उदयनराजे भोसले

News Desk

ठरलं! पावसाळी अधिवेशन २ दिवसांचं होणार

News Desk
महाराष्ट्र

बिफ बाळगणे गुन्हा ठरणार नाही, उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला धक्का

News Desk

नवी दिल्लीः बीफ जवळ बाळगणे गुन्हा ठरत नाही, असेमुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले असून यामुळे राज्यसरकारला मोठा धक्का मानला जात आहे.

राज्य सरकारने १९९५ च्या पशु संवर्धन कायद्यात दुरुस्ती केली असून बीफ जवळ बाळगणे गुन्हा समजण्यात येईल, असे म्हटले होते. मात्र, हा प्रकार म्हणजे खासगीपणाचे उल्लंघन असल्याची टिप्पणी करत उच्च न्यायालयाने ही तरतूद रद्द ठरवली होती. बीफ जवळ बाळगणे गुन्हा ठरवण्याची तरतूद घटनाविरोधी आहे, असेही न्यायालयाने नमूद केले होते. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे राज्यसरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Related posts

यश जेव्हा यायचं तेव्हा येईल, त्यासाठी तुम्ही धीर सोडू नका… राज ठाकरेंचे भावनिक पत्र!

swarit

G-२० परिषदेसाठी आलेल्या महिला प्रतिनिधीनी घेतला शहराचा निरोप

Aprna

“पराभूत झालो तरी संपलो नाही”, पंढरपूरच्या निकालानंतर भगीरथ भालकेंची पहिली प्रतिक्रिया

News Desk