१५ हजार रुपयाची लाच मागणारा हदगाव तलसिलचा नायब तहसीलदार गजाआड
उत्तम बाबळे
नांदेड:-हदगाव तहसील कार्यालयात दाखल असलेल्या एका जमिन दावा प्रकरणात तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या नायब तहसीलदास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड पथकाने रंगेहाथ पकडले असुन त्याच्या विरुद्ध हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या लाचखोर नायब तहसीलदाराला अटक करण्यात आल्याने महसुल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
२ जानेवारी २०१७ रोजी एका तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली की,हदगावच्या तहसील कार्यालयात त्यांच्या जमिनीचा एक दावा सुरु आहे.त्या दाव्यात निकाल आपल्या बाजूने देण्यासाठी तेथील नायब तहसीलदार विकास फुलसिंग राठोड यांनी १५ हजार रुपये लाचेची मागणी केलेली आहे. या बाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिनांक ३ जानेवारी २०१७ रोजी तहसील कार्यालय हदगाव येथे लाच मागीतल्या बाबतची पडताळणी केली.तेव्हा नायब तहसीलदार (वर्ग-२) विकास फुलसिंग राठोड यांनी पंचासमक्ष १५ हजार रुपयाची लाच माजीतली आणि ती लाच स्वीकारण्याची तयारी दाखवली.त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज दि.२३ जानेवारी २०१७ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड चे पोलीस उप अधीक्षक संजय कुलकर्णी यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने हदगाव तहसील कार्यालयात जाऊन साफळा रचुन विकास फुलसिंग राठोड यांना अटक करून हदगाव पोलीस ठाण्यात आणले .उपरोक्त फिर्यादीवरून भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ नुसार त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तसेच लाचेची मागणी करणाऱ्या या नायब तहसीलदार विकास फुलसिंग राठोड (४९) यास अटक केली आहे.
ही कार्यवाही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संजय लाठकर,अपर पोलिस अधीक्षक सुरेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक संजय कुलकर्णी,पोलीस कर्मचारी साजिद अली,बाबू गाजूलवार,शेख चांद,विलास राठोड,ताहेरखान फहाद,चालक शिवहर किडे यांनी पार पाडली. या कार्यवाही सोबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जनतेला आवाहन केले आहे की,कोणी शासकीय अधिकारी/कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असेल आणि कोणाच्या भ्रष्टाचारा बाबत काही माहिती असेल तर जनतेने त्या बाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागास माहिती द्यावी.तसेच एखाद्या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी अपसंपदा संपादीत केली असल्यास त्या बाबत प्रत्यक्ष अथवा टोल फ्री क्रमांक १०६४(२) कार्यालयाचा क्रमांक ०२४६२२५३५१२ आणि पोलीस उप अधीक्षक संजय कुलकर्णी यांचा मोबाईल क्रमांक ८५५४८५२९९९ वर संपर्क साधावा.
यापूर्वी मंडळ अधिकारी पदावर असताना राठोड याना किनवट तालुक्यात जनतेच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले होते, तसाच प्रकार हिमायतनगर तालुक्यात करून फेरफार प्रकरणे, गौण खनिज तस्करांकडून माया गोळा केल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडून केल्या गेला होता आहे. त्यानंतर आता हदगाव तालुक्यातही या लालचावलेल्या अधिकाऱ्याने सर्वसामान्यांना वेठीस धरल्यामुळे घडा भरला आणि आज अखेर तो भ्रष्टाचारी अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्याने त्यांच्या लाचखोरीला बळी पडलेल्या नागरीकातून समाधानाचे बोल पुढे येऊ लागले आहेत. या लाचखोराच्या संपत्तीची व बैंक खात्यांची चौकशी करून सर्व मालमत्ता जप्त करण्यात यावी अशी मागणीही जोर धरू लागली असून हदगाव महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.