HW News Marathi
मनोरंजन

एस. के. राय कनिष्ठ महाविद्यालयाने राबवली स्वच्छता मोहीम

मुंबई | राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यासाठी मुंबईच्या एस. के. राय कनिष्ठ महाविद्यालयाकडून लोकमान्य टिळक टर्मिनस येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले होते. या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक टर्मिनसच्या स्वच्छतेसाठी तब्बल तीन तास परिश्रम घेतले. या स्वच्छता मोहिमेला लोकमान्य टिळक टर्मिनसचे प्रमुख स्टेशन मास्टर, रेल्वे पोलीस व स्थानिक नागरिकांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला.

महाविद्यालयाच्या प्राचार्या संजू कुमारी यादव व सांस्कृतिक समितीचे प्रमुख अभय जाधव व मंजू यादव तसेच संदीप गुप्ता, अश्विनी नागतीलक, संदीप खंडीभराड यांच्या मार्गदर्शनाखाली या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक टर्मिनस स्वच्छ करण्याचे काम केले. रेल्वे स्थानकाच्या परिसरात पडलेल्या प्लास्टिकच्या असंख्य वस्तू, खाद्यपदार्थांची आवरणे, कागदी कचरा असा सर्व कचरा विद्यार्थ्यांनी गोळा करून तो परिसर स्वच्छ केला. या अभियानात एकूण ३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

संपूर्ण देशभरात कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कचऱ्यामुळे आपल्या प्रत्येकालाच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने समाजात स्वच्छतेबाबत जनजागृती करणे अत्यंत महत्वाचे ठरते. जेथे नागरिकांची गर्दी जास्त असते तिथे कचऱ्याचे प्रमाणही मोठे असते. मुंबईत चौपाट्या आणि विशेषतः रेल्वे स्थानकांच्या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य सर्वाधिक दिसते. या समस्येवर तोडगा काढणे हे गरजेचे आणि महत्वाचे आहे. याचसाठी एस. के. राय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रेल्वे स्थानक स्वच्छता मोहीम हाती घेऊन जनजागृतीदेखील केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रुद्रम मालिकेतून मुक्ता बर्वे पुन्हा छोट्या पडद्यावर

News Desk

Anant Chaturdashi | बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई सज्ज

swarit

Gandhi Jayanti : सरकारचा गांधीगिरीने निषेध, जुन्या पेन्शन योजनेची मागणी

Gauri Tilekar