HW News Marathi
मुंबई

आज दहावीचा निकाल

पुणे – इयत्ता दहावीच्या वार्षिक परिक्षेचा निकाल आज जाहीर होणार असल्याचं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं जाहीर केलंय. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या निकालाविषयीच्या उलटसुलट चर्चांना आता पूर्णविराम मिळालायं. मंगळवारी (दिन. 13 जून) दुपारी 1 वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी दिली आहे.

आतापर्यंत दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जात होता. यावर्षी त्या तुलनेत एका आठवड्याचा विलंब झालाय. त्यामुळं सोशल मीडियातून उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. शिवाय वर्षभर मेहनत घेतलेल्या विद्यार्थी आणि पालकवर्गातही निकालाविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यांची उत्सुकता मंगळवारी संपणार आहे. राज्यातून 2017 मध्ये मंडळाच्या परिक्षेसाठी 14 लाख विद्यार्थी पात्र झाले होते. राज्य शासनाने अध्यादेश काढून चित्रकला, संगीत आदी कला विषयांच्या गुणांचा समावेश दहावीच्या गुणपत्रिकेत करण्याचा निर्णय घेतला. ऐनवेळी कलागुणांची नोंद करावी लागल्याने दहावीचा निकाल लावण्यास विलंब लागल्याचे सांगण्यात येत आहे.

खालील वेबसाईट्सवर जाऊन ऑनलाईन दहावीचा निकाल पाहू शकता

www.mahresult.nic.in

www.result.mkcl.org

www.maharashtraeducation.com

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत जेल भरो आंदोलनाला पूर्ण विराम

swarit

सायन रुग्णालयातील डॉक्टर आज संपावर

News Desk

कोचिंग क्लासच्या संचालकाने केला मुलावर अत्याचार

News Desk