HW News Marathi
महाराष्ट्र मुंबई

‘कोण करणार आमच्या घरांचे रक्षण?’, अंधेरीच्या पोलीस कुटुंबीयांचा सरकारला सवाल

मुंबई | कोरोना निर्बंध हटवण्यात आल्यानंतर तब्बल 2 वर्षांनी राज्यभरात उत्साहाने नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. मात्र, कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलिसांनाच आता ‘कोण करणार आमच्या घरांचे रक्षण’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे, पोलिसांच्या घरांच्या दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा वर डोकावत आहे. अंधेरीतील न्यू म्हाडा पोलीस वसाहतीच्या गरब्यादरम्यान आयोजित वेशभूषा स्पर्धेत पोलोस कुटुंबातील एका युवकाने वर्दीतल्या विठ्ठलाची वेशभूषा साकारली. यावेळेस, पोलीस वसाहतीतील 4 प्रमुख प्रश्नांनी सर्वांचे लक्ष वेधले. पोलिस दलाच्या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्या तरच त्यांच्याकडून अधिकाधिक सेवा बजावता येऊ शकते, अशी टिप्पणी देखील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CID) 2014 च्या एका अहवालात करण्यात आली होती.

गेल्या काही वर्षांत डागडुजीचे काम न झाल्याने वसाहतीतील अनेक इमारतींचे स्लॅब कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अनेक तक्रारी देऊनही प्रशासन योग्य ती दखल घेत नसल्याने पोलीस कुटुंबीय हतबल झाले आहेत. यश रावराणे या पोलोस कुटुंबातील युवकाने वर्दीतल्या विठ्ठलाची वेशभूषा साकारली. यावेळेस “पोलीस भरती हा शब्द ऐकायला छान पण पोलिसांच्या भविष्याचं काय, आहेका कोणाला भान?”, “दिवसभर घेऊन हातात काठी, कधी येईल आमच्या हक्काच्या घरांवर आमच्या नावाची पाटी?”, “पत्त्या सारख्या कोसळताहेत आमच्या वसाहती, भेगा पडल्या आहेत आमच्या घरांच्या भिंतींवर, कोण जबाबदार या परिस्थितीवर?”, “आम्ही करतो जनतेचे रक्षण, कोण करणार आमच्या घरांचे रक्षण?” हे 4 प्रमुख प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fhadanvis) यांना विचारण्यात आले.

दरम्यान, पोलिसांच्या घरांचा प्रश्न हा राज्य शासनाच्या सर्वोच्च प्राधान्याचा विषय असून पोलिसांच्या (Police) घरांसाठी गृह, नगरविकास, गृहनिर्माण, सिडको या सर्व विभागांनी समन्वयाने सर्वंकष आराखडा तयार करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 28 जुलैला दिले होते. त्याचप्रमाणे, पोलिसांसाठी अधिकाधिक घरे बांधण्याची जबाबदारी पोलीस गृहनिर्माण महामंडळावर सोपविण्यात आली असून यंदा त्यासाठी तब्बल ८०२ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. बीडीडी चाळीतील घरे १५ लाखांमध्ये पोलिसांना देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात जाहीर केला होता. मात्र, आता न्यू म्हाडा पोलीस वसाहतीतील पोलीस कुटुंबीयांनी देखील बीडीडी चाळीप्रमाणेच वसाहतीतील म्हाडाची 1092 घरं मुबलक दरात देण्यात यावी अशी मागणी या वेशभूषा स्पर्धेतून केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसे कार्यकर्त्यांकडून गुजराती पाट्यांची तोडफोड

News Desk

सावित्री नदीने ओलांडली धोक्याची पातळी, नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

News Desk

कोरोनाला आळा घालण्यासाठी ‘फिव्हर क्लिनिक’ सुरु करण्यात येणार

swarit