HW News Marathi
मुंबई

चिकोत्रा धरणातील पाण्यासाठी खोदणार दिंडेवाडी डोंगरात चर

गारगोटी (कोल्हापूर): झुलपेवाडी येथील चिकोत्रा धरणाकडे येणाऱ्या पाण्याचे मार्ग वाढविण्यासाठी दिंडेवाडी गावाच्या डोंगरावरील भावेश्वरी मंदिरापासून चर काढून पाणी धरण साठ्यात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे धरणाची जलपातळी वाढणार असून त्याचा लाभ शेजारच्या गावांना मिळणार आहे.

चिकोत्रा धरणक्षेत्रात पावसाची कमतरता व पाणी वाहून आणण्यासाठी कमी जलवाहिन्या यामुळेच धरण बांधल्यापासून केवळ दोनवेळा हे धरण भरले होते. आजपर्यंत ४५ ते ५० टक्के धरण भरते. त्यामुळेच या धरणाखाली येणाऱ्या भिजक्षेत्रातील पिके पाण्याविना सुकून जातात. हे धरण भरण्यासाठी म्हातारीच्या पठारावर वनबंधारा बांधून तो बंधारा भरल्यानंतर पाणी या धरणाकडे वळविण्यात आले होते. परंतु, मेघोली ग्रामस्थांच्या भात रोप लावणीसाठी अडचणी निर्माण झाल्यामुळे या पाण्यावरून वाद निर्माण झाला. शेवटी तडजोडीअंती दोन्ही बाजूला निम्मे-निम्मे पाणी

लावण्यात आले. त्यामुळे भुदरगड पंचायत समिती माजी उपसभापती विश्वनाथ कुंभार यांच्या प्रयत्नांतून आमदार हसन मुश्रीफ यांच्या निधीतून दिंडेवाडी गावाच्या पूर्वेला डोंगरावर असलेल्या भावेश्वरी मंदिराच्या परिसरातून सुमारे अडीच कि.मी. चर मारून तेथून पाणी या धरणात सोडण्यात येणार आहे. नुकताच या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबईत एनटीपीसीच्यावतीने नो टोबॅको मोहिमेला सुरूवात

News Desk

…तर त्या वाहनांची नोंदणी होणार नाही

News Desk

दाऊदच्या कोट्यवधी संपत्ती विकत घेण्यासाठी 12 जण इच्छुक

News Desk
मुंबई

गोड्या पाण्यातील मच्छिमारांचे धरणे आंदोलन

News Desk

मुंबई – राज्यात परंपरागत गोड्या पाण्यात मासेमारी करणारे मच्छिमार विविध मागण्यांसाठी 2 ऑगस्ट रोजी आंदोलन करणार आहेत. महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आझाद मैदान येथे करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छिमारांचे कर्ज माफ करण्यासाठी समिती स्थापन करण्यात यावी. मत्स्यव्यवसायाची इत्यंभूत माहिती असणाऱ्या व्यक्तीला मत्स्यव्यवसाय मंत्री म्हणून नेमावे आणि महादेव जानकर यांच्याकडून हे पद काढून घ्यावे अशी मागणी यावेळी महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समितीच्यावतीने करण्यात आली.

Related posts

मुंबईतून 50 उड्डाणे रद्द

News Desk

मोबाइल चार्जिंगला लावून बोलणे जीवावर बेतले

News Desk

फोन टॅपमुळे सेनेच्या उपविभागप्रमुखांची हकलपट्टी

swarit