HW News Marathi
मुंबई

ठाण्यात सेनेसमोर राष्ट्रवादीचं आव्हान

मुंबई महापालिकेच्या निवडणुक प्रचारात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घड्याळाची ‘टिकटिक’ फारशी ऐकु येत नसली तरी ठाण्यात मात्र आव्हाड-परांजपे जोडगोळीने सेनेला जोरदार आव्हान दिले आहे. फसलेले पाणीधोरण, कचऱ्याची उग्र समस्या, शहरातील वाहतूक कोंडी यावर ठाण्यात सेनेला जाब विचारला जात आहे. आता पालिकेच्या शिवाजी रूग्णालयात झालेल्या एका शस्त्रक्रियेवेळी ‘झुरळ’ ऑपरेशन थियटरमध्ये फिरत असल्याची चित्रफित शहर राष्ट्रवादीने सोशल मिडीयावर व्हायरल केली आहे. ही शस्त्रक्रिया काही महिन्यांपूर्वी रूग्णालयात झाली होती व या झुरळ प्रकरणाने पालिका वर्तुळात खुप गोंधळही माजला होता. पण एका झुरळाने राष्ट्रवादीला आधार दिला आणि पालिकेच्या भोंगळ कारभारचा नमुना ठाणेकरांसमोर आणला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

श्रीदेवी यांचे पार्थिव निवासस्थानी पोहोचले

News Desk

टिकटॉक फेम फैझल शेखसह ४ जणांवर गुन्हा दाखल

News Desk

अमेरिकी महिलेच्या कॅमेऱ्याने जगापुढे आणली कामाठीपुराची वस्तुस्थिती,अंडरवर्ल्डचा मोठा अड्डा

News Desk