HW News Marathi
मुंबई

पुण्यात मुख्यमंत्र्यांची पारदर्शी सभा – सोशल मिडीयावर सभेबाबत उलटसुलट चर्चा

 

मुख्यमंत्र्यांच्या पुण्यातील नियोजित सभेचं छायाचित्र

अजय कल्याणे

– रिकाम्या खूर्च्या बघून मुख्यमंत्री फिरले माघारी

पुणे – पुणे महापालिका निवडणुकीचा आखाडा तापला असून दिग्गज नेत्यांच्या सभांनी शहर दणाणलं आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आज दुपारी दोन वाजता न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार होती. भाजपने सभेचे नियोजनही केले. या सभेला मोठी गर्दी होईल, असा अंदाज होता. पण मुख्यमंत्र्यांची सभा असूनही सभेतील खुर्च्या रिकाम्याच होत्या. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांच्या या नियोजित सभेला गर्दी नसल्याची खिल्ली सोशल मिडियातून उडवण्यात आली. पारदर्शी कारभाराचा दावा राज्य सरकार करत असल्यामुळं त्यांच्या सभेलाही पारदर्शी गर्दी झाल्याची टीका सोशल मिडियावर उमटू लागल्या आहेत.

 

मुख्यमंत्री सभेच्या ठिकाणी २.१५ वाजता आले. पण मैदानातील कार्यकर्त्यांची संख्या आणि रिकाम्या खुर्च्या बघून ते लगेच माघारी फिरले. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभा रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. नियोजनाअभावी सभा रद्द करत असल्याचे त्यांनी ट्विटरद्वारे स्पष्ट केले आणि पिंपरीत होणाऱ्या प्रचारसभेसाठी ते गेले आहेत. पुण्यातील सभेला कार्यकर्त्यांची गर्दी झाली नसली तरी, पिंपरीत होणाऱ्या सभेला प्रचंड गर्दी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लाईफलाईन ठरतेय डेथलाईन

Arati More

राज ठाकरे होणार सक्रीय पुन्हा नव्या जोमाने मैदान गाजवण्यास सज्ज…!

Adil

बेस्टच्या संपावर आजही तोडगा नाहीच, उद्या सकाळी होणार पुन्हा सुनावणी

News Desk