HW News Marathi
मुंबई

बिना ड्रायव्हरची मेट्रो लवकरच मुंबईकरांच्या भेटीला…

अक्षय घुगे

मुंबई: मुंबईत लवकरच बिना ड्रायव्हरची मेट्रो म्हणजेच चालक विरहित मेट्रो धावणार आहे. कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो ३ प्रकल्पात कम्युनिकेशन बेस्ड टॅक्नॉलॉजीच्या आधारावर हि मेट्रो धावणार आहे.

यामध्ये अद्ययावत सिग्नल प्रणाली वापरण्यात येणार असल्यामुळे मेट्रो चालवण्यासाठी चालकाची गरज लागणार नाही. या तंत्रज्ञानामुळं मेट्रोतील दोन फेऱ्यांमध्ये २ मिनिटांपेक्षा कमी वेळ राखणं शक्य होणार आहे.

याशिवाय मेट्रो-३ चा हा प्रकल्प संपूर्ण भुयारी मार्गाचा असून, शहरातला अशाप्रकारचा हा पहिलाचा प्रकल्प असणार आहे. ८ डब्याच्या अश्या ह्या ३१ गाड्या कुलाबा ते सिप्झ मार्गावर धावणार आहेत. पीपीपी तत्त्वावर हा प्रकल्प उभारण्यात आला असून यामध्ये ५ कंपन्यांनी सहभाग नोंदवला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

उल्हासनगरातील शौचालयचा दुरावस्थेचा ठपका

News Desk

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीने राजकारण तापले; 3 महिन्यांपासून स्थानिकांची पाण्यासाठी वणवण

Chetan Kirdat

चीनी चोरट्यांनी मुंबईतून चोरला ३४ लाखांचा हिरा

News Desk
क्राइम

पतीने पत्नीला चालत्या रेल्वेखाली ढकलून दिले

News Desk

संतप्त पतीने पत्नीला लोकलमधून फेकले

रेल्वे बलाच्या शिपायाने वाचवले महिलेचे प्राण

मुंबई : पत्नीवरील अनैतिक संबंधाच्या संशयावरूनचा वाद विकोपाला गेल्याने पतीने पत्नीला धावत्या रेल्वेतून खाली फेकल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. या दुर्घटनेत सुनिता रोकडे ही महिला जखमी झाली आहे. दुर्घटनेप्रसंगी रेल्वे बलाच्या राधेश्याम गुर्जर यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे रोकडे यांना वेळीच उपचार मिळाल्याने त्यांना वाचवण्यात यश आल्याचे डॅाक्टरांकडून सांगण्यात आले.

रबाळेमध्ये सुनिता दोन मुले आणि नवरा अब्दुल हमीद शेख याच्यासोबत मागील तीन वर्षांपासून राहते. सुनिताचे यापूर्वीही एक लग्न झाले असून तिला पाच मुले आहेत. मात्र नवऱ्याशी न पटल्याने सुनिता कालांतराने दोन मुलांसह वेगळी राहत होती. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी तिने अब्दुल शेख याच्याशी दुसरे लग्न करून ती रबाळे येथे राहत होती. मात्र व्यसनाच्या आहारी गेलेला शेख वारंवार सुनिताच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यावरून दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. शुक्रवारी सायंकाळी घणसोली येथून कामावरून सुटलेल्या सुनिताचा अब्दुलने पाठलाग केला. त्यावेळी घरी परतताना दोघेही ठाण्याला जाणाऱ्या एकाच लोकलमध्ये चढले. रेल्वेच्या दरवाजातच दोघांचे भांडण सुरू होते. त्यावेळी राग अनावर झालेल्या अब्दुलने धावत्या लोकलमधून सुनिताला ढकलून दिले. रेल्वेतील इतर प्रवाशांनी हा प्रकार पाहून आरडाओरडा केला. त्याचवेळी रबाळे स्थानकावर अब्दुलने धावत्या रेल्वेतून उडी टाकून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी त्याला रेल्वे सुरक्ष बलाच्या हवाली करत घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यावेळी घणसोली स्थानकात गस्तीवर असलेले रेल्वे बलाचे शिपाई राधेश्याम गुर्जर यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी महिला जिवंत असल्याचे लक्षात आल्यानंतर गुर्जर यांनी क्षणाचाही विचार न करता, ठाण्याला जाणाऱ्या रेल्वेच्या पटरीवर उभे राहून रेल्वे थांबवली. त्याच रेल्वेतून जखमी सुनिताला रबाळे स्थानकावर नेले. रबाळे स्थानकावरून राधेश्यामने सुनिताला रिक्षाने जवळील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

Related posts

आठ वर्षाच्या बालकाची निर्घृण हत्या

News Desk

फेसबुक पोस्टमुळे काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या

swarit

शहांवर टीका केल्यासंदर्भात चव्हाणांवर कंबोजांनी पोलिसात केला गुन्हा दाखल

Aprna