HW News Marathi
मुंबई

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीने राजकारण तापले; 3 महिन्यांपासून स्थानिकांची पाण्यासाठी वणवण

मुंबई | शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर आता अंधेरी पूर्व विधानसभेच्या निवडणुका (Andheri East Assembly By-election) जाहीर झाल्या आहेत. आमदार रमेश लटके यांच्या जागेवर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवार आहेत. दोन दिवसांपासून ऋतुजा लटकेंच्या उमेदवारीवरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाने ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्यावर मुंबई उच्च न्यायालयात आज (13 ऑक्टोबर) सुनावणी पार पडली. यानंतर मुंबई महानगर पालिकेने उद्या 11 वाजेपर्यंत राजीनामा मंजूर केल्याचे पत्र द्यावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहे. परंतु, या राजकारणात अंधेरी पूर्व विधानसभेतील जनता मात्र पाण्यासाठी ताहानलेली आहे. पाण्याच्या मुद्यांवर कोणीही चर्चा देखील करत नसल्याने स्थानिकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. अंधेरी पूर्वच्या मालपाडोंगरी 3 भागात मागच्या महिनाभरापासून अधिक काळ पाणीच येत नाहीये. इथली जनता तहानलेली असल्याचे चित्र दिसत आहे.

 

सध्या इथल्या पाण्याच्या परिस्थितीबाबत आम्ही मालपाडोंगरी 3च्या नागरिकांशी संवाद साधला असता त्या लोकांचे म्हणणे आहे की, “जून महिन्यापासून आम्हाला पाण्याची समस्या आहे. सुरुवातीला व्यवस्थित पाणी येत होते. मात्र, आता आम्हाला पाण्यासाठी वणवण करावी लागते. टॅंकर येतो त्याला सुद्धा वेळ नाही, त्याच पाणी पुरत नाही. आम्ही इथल्या पालिका अधिकाऱ्यांशी भेटलो त्यांना आमच्या समस्या सांगितली पत्रव्यवहार केला. इथल्या लोकप्रतिनिधींशी भेटलो त्यांच्याशी आमच्या समस्या मांडल्या. मात्र, कुणालाही आमचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नाही. रमेश लटके होते तेव्हा एक काळ होता आम्हाला पाण्यासाठी कधीही वणवण भटकावे लागले नाही. मात्र, आता आम्हाला पाणी पाणी करावे लागतय.” अशा प्रतिक्रिया इथल्या स्थानिक नागरिकांनी दिले आहेत.

 

मालपाडोंगरी या भागाची लोकसंख्या साधारण सहा ते साडेसहा हजार आहे. जवळ जवळ असलेली घर, अरुंद रस्ते असा हा परिसर आहे. महानगरपालिकेच्या पाण्याची पाईपलाईन आहे. मात्र, त्यात पाणीच येत नसल्याने इथल्या नागरिकांना पाहण्यासाठी भटकावे लागते. एकीकडे मुलांचे शाळा, घरच काम आणि त्यात पाण्यासाठी करावी लागणारी वणवण या सगळ्यामुळे इथल्या महिलांची खूपच ओढाताण होत असल्याची प्रतिक्रिया या महिलांची बोलताना दिली आहे.

संबंधित बातम्या

ऋतुजा लटकेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा! उमेदवारीचा मार्ग मोकळा

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजमेरा बिल्डरला ५०० कोटीचा फायदा केल्याचा BMC वर आरोप; भाजप आमदरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Aprna

मुंबई विमानतळावर सोने तस्करीचे रॅकेट उघडकीस

News Desk

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे ऑडिट झाल्यास सत्य बाहेर येईल !

News Desk