HW News Marathi
मुंबई

भारताचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली | भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला असला, तरी तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे.

महेंद्रसिंह धोनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व फोटो पोस्ट केले आहे. त्याशिवाय या व्हिडीओला ‘मै पल दो पल का शायर हूँ,’ हे गाणं शेअर करत निवृत्तीची घोषणा केली आहे. “तुम्ही दिलेलं प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभारी आहे,” असे कॅप्शन त्याने या पोस्टला दिले आहे.

https://www.instagram.com/tv/CD6ZQn1lGBi/?igshid=1w2l1l83e8o7s

धोनीपाठोपाठ भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना यानंदेखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सुरेश रैनानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरूनच आपली निवृत्ती जाहीर केली आहे. २०१८ मध्ये रैना आपला अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. तर २०१५ मध्ये तो अखेरचा कसोटी सामना खेळला. रैनाच्या निवृत्तीपूर्वीच भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यानंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. त्याच्या निवृत्तीच्या घोषणेच्या काही वेळातच रैनानंही आपल्या निवृत्तीची घोषणा केली.

रैनानं आतापर्यंत भारतासाठी १८ कसोटी सामने, २२६ एकदिवसीय सामने आणि ७८ टी-२० सामने खेळले आहेत. तर त्याच्या नावावर एकदिवसीय सामन्यांमध्ये ५,६१५ धावा आहेत. तर त्यानं एकदिवसीय सामन्यांमध्ये ३६ विकेट्सही घेतल्या आहेत. तर त्यानं आतापर्यंत १८ कसोटी सामन्यांमध्ये ७६८ धावा आणि १३ विकेट्स आणि टी-२० सामन्यांमध्ये १,६०५ धावा केल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतना संदर्भात प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती

News Desk

देहविक्री रोखण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांचा पुढाकार

News Desk

जखमी गोविंदांची सांस्कृतिक मंत्र्यांनी घेतली भेट

swarit