,’अरे तुम्हासर्वांना बरोबर घेऊन मी मुघलांशी लढलो! आणि आज तुम्ही एकमेकांच्या विरोधात लढताय!का? तर त्या जातीयवादी स्वार्थी नेत्यांसाठी! या रे माझ्या लेकरांनो त्या चिखलातून बाहेर या! असं या व्यंगचित्राच नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर व्यंगचित्र रेखाटलं होतं.२०१९ साली होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत स्वबळावर उतरण्याची भाषा करणाऱ्या पण प्रत्यक्षात केंद्र आणि राज्यातील सत्ता न सोडणाऱ्या शिवसेनेवर राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून जळजळीत टीका केली. व्यंगचित्रामधून शिवसेनेच्या सत्ता सोडण्याच्या धमक्यांचा समाचार घेतला आहे.

युतीमध्ये बेबनाव आल्याने शिवसेनेकडून युती तोडून सत्ता सोडण्याच्या धमक्या सातत्याने देण्यात येत आहेत. त्यावर टीका करणारे व्यंगचित्र राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केलं. “