HW News Marathi
मुंबई

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

मुंबई प्रत्येक कुटुंबाला ७०० लिटर शुद्ध व स्वच्छ पाणी मोफत देण्यात येणार, तलावांची क्षमता वाढवण्यात येणार यासारख्या मुद्दयांचा समावेश असलेला जाहीरनामा राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसिद्ध केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील काही महत्त्वाचे मुद्दे –

बेस्ट विद्युत ग्राहकाला 100 मीटर युनिट्स मोफत करण्याबाबत योजना. बेस्ट बसेसचे किमान भाडे ५ रुपये तर जास्त भाडे २० रुपये करण्याचा प्रयत्न केला जाणार

मुंबई शहर व पूर्व-पश्चिम उपनगरांतील मुख्य रस्त्यांचे टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रिटीकरण करणार, नवीन पार्किंग पॉलिसी बनवणार, भविष्यात मुंबईच्या रसत्यांवर खड्डे दिसणार नाही.

निरामय आरोग्य योजनेअंतर्गत वर्षाला 101 रुपये भरून शासकीय आणि खासगी रुग्णालयात आरोग्य सेवा योजना दिली जाणार

मुंबईकरांचा आरोग्यविमा उतरवून त्याचे प्रिमियम मनपा आपल्या तिजोरीतून भरेल

मुंबईतील डंपिंग ग्राऊंडना चारही बाजुने कुंपन घालून सीसीटीव्ही कॅमऱ्याद्वारे २४ तास देखरेख करणार

एसएमएस, व्हॉट्अप द्वारे कचरा हटाव मोहीम योजना राबवणार

झोपडपट्टीवासियांना सोयी-सुविधा दिली जाणार, झोपडपट्टीवासियांचे जीवन सुखकर करणार

महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधून व्यवसाय शिक्षण व तंत्रशिक्षणयुक्त शिक्षण विद्यार्थ्यांना देणार

मुंबईभर प्रत्येक वॉर्डात मोफत वायफायची सुविधा देणार, आपत्कालीन व्यवस्थेसाठी वॉर्डनिहाय २४ तास फ्री कॉल सेंटर्स उभारणार

महिला बचत गट आणि सहकारी संस्थांच्या सहकार्याने मोबाईल व्हेंडर्स मार्फत घरगुती व महिलांच्या उपयोगी वस्तुंची वितरण साखळी निर्माण करणार.

बचत गटांसाठी निधी व जागा उपलब्ध करुन देणार

समुद्र किनाऱ्याजवळील स्थानिक भूमीपूत्रांची लाईफ गार्ड म्हणून नियुक्ती करणार.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंजिनीअर्ससाठी भावीकाळात करिअरच्या नव्या संधी

News Desk

अमिताभ बच्चन यांच्या हस्ते 28वा रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू

News Desk

येस बॅंकेला एसबीआयचा मदतीचा हात !

swarit