HW News Marathi
मुंबई

‘मरे’वर रुळाला तडा

मुंबई – रोज ‘मरे’साठी प्रसिद्ध असलेली मध्य रेल्वे आज सकाळी ऐन गर्दीच्या वेळी पुन्हा कोलमडली. आज निमित्त होतं ते, दिवा स्थानकात रुळाला तडा गेल्याचं. या गोंधळामुळे मुंबईकडे येणाऱ्या धीम्या गाड्या तब्बल ते अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले.

दरम्यान, रेल्वे रुळ काही वेळातच दुरुस्त करण्यात आला. मात्र या काळात मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाचा पुरता बोजवारा उडाला आहे. सकाळची वेळ असल्याने कामावर वेळेत पोहणचण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना विनाकारण स्थानकावर ताटकाळत राहावं लागत आहे.

दिवा स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेला होता. यानंतर धीम्या मार्गावरची वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली होती. रुळ दुरुस्तीचं काम पूर्ण झालं आहे, मात्र यामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक अर्धा तास उशिराने सुरू होत्या. परिणामत:दिवा, मुंब्रा, कळवा स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढू लागली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरण; आदित्य ठाकरेंचा निकटवर्तीय पोलिसांच्या ताब्यात

News Desk

कर्नाटकातील राजकीय परिस्थितीवर येडियुरप्पा म्हणतात “वेट अँड वॉच”

News Desk

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड

News Desk
देश / विदेश

नागरिकतेवर प्रश्न उपस्थित करणे यासारखे दुर्दैव नाही – हमीद अन्सारी

News Desk

नवी दिल्ली – जमावांकडून एखाद्या निष्पाप व्यक्तीची निर्घृणपणे करण्यात येणारी हत्या, ‘घरवापसी’, यांसारख्या घटना घडत असतील, तर ही भारतीय मूल्य कमकुवत होत असल्याची लक्षणे आहेत. तुमच्या भारतीय नागरिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाणे, यासारखी दुसरी दुर्दैवी घटना नाही, अशा शब्दांत मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

सलग दुसऱ्यांदा उपराष्ट्रपतिपद भूषवलेल्या अन्सारी यांचा कार्यकाळ आज गुरुवारी संपत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभा टीव्हीने त्यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी देशात सध्या सुरू असलेल्या घडामोडीवर भाष्य केले.

‘देशातील मुस्लिम समाजामध्ये सध्या भीती आणि असुरक्षेतेची भावना आहे. मुस्लिम समाजाकडे संशयाने पाहिले जाते. देशातील वेगवेगळ्या भागात मी गेलो, त्यावेळी मला असेच संशयाचे बोल ऐकायला मिळाले. बेंगळुरूला गेलो तेव्हाही मी हेच ऐकले आणि उत्तर भारतातून तर मोठ्या प्रमाणात असेचऐकायला मिळते,’ असेही अन्सारी म्हणाले. देशभर सुरू असलेल्या तीन तलाकवर बोलताना अन्सारी म्हणाले की, तीन तलाकच्या अनुचित प्रथेबद्दल दुमत होऊ शकत नाही. मात्र न्यायालयाने यात हस्तक्षेप करू नये, कारण कोणताही बदल समाजामधूनच होत असतो, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

Related posts

त्रिशतकवीर मोहितला आयपीएलकडून ऑफऱ

News Desk

भारताचे ‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंग यांचे निधन

News Desk

ममता बॅनर्जींनी तालिबानशी केली भाजपची तुलना; म्हणाल्या…

News Desk