HW News Marathi
मुंबई

मालगाडी घसरल्याने नाशिक, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा

कसारा- कसारा रेल्वेस्थानकाजवळ मालगाडीचे डबे घसरल्याने नाशिक तसेच मुंबईकडे जाणाऱ्या बहुतांश रेल्वे रखडल्या असून विकेंडला घरी जाणाऱ्या चाकरमान्यांचा मोठा खोळंबा झाला आहे. कसाऱ्याजवळ मालगाडीच्या डबे घसरण्याच्या घटनेमुळे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून कसारा स्टेशन गाठणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल सुरू आहेत. घसरलेले डब्बे रुळावर आणण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भुयारी मार्ग की, स्वीमिंग पूल…

swarit

आईला लाथ मारल्याचा रागातून भाऊजीची हत्या

News Desk

92 लाख दंड भरण्यास शासकीय अधिका-यांची चालढकल

News Desk
मुंबई

दहीहंडीला मूक दिन पाळण्याचा निर्णय

News Desk

मुंबईः यंदा १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन आणि दहीकाला एकाच दिवशी असले, तरी याच दिवशी राज्यातील प्रकाश आणि ध्वनी व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रोफेशनल ऑडियो अँड लायटिंग असोसिएशन या संघटनेने (पाला) राज्यव्यापी मूक दिन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. कायद्याचा चुकीचा अर्थ लावल्याने होणाऱ्या समस्यांविरोधात स्वातंत्र्य दिन व दहीहंडी उत्सवादिवशी लाउडस्पीकर व लायटिंग बंद ठेवणार असल्याचे पालाने मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. लाऊडस्पीकरच्या उद्योगावर भवितव्य अवलंबून असणारी अनेक कुटुंबे आहेत. मात्र, राज्यातील लाऊडस्पीकरच्या बंदीमुळे प्रकाश, ध्वनीशी संबधित असलेला हा उद्योग अडचणीत सापडला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ७५ डेसिबलचे बंधन पाळावे लागते. मात्र वाहतुकीच्या आवाजांसह वातावरणातील ध्वनीची पातळी वाढत आहे, त्यामुळे या निर्णयावर पुनर्विचार व्हावा, अशी मागणी ‘पाला’ संघटनेने केली आहे.

Related posts

पनवेल ग्रामीण डॉक्टर वेल्फेअरच्या वतीने केरळ पुरग्रस्तांना मदत

News Desk

बदलापूरमधील केमिकल कंपनीला भीषण आग

News Desk

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

News Desk