उत्तम बाबळे
नांदेड :- हुंडा प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. तालुक्याच्या ठिकाणी बाल विकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ), जिल्हास्तरावर महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी, तर राज्यस्तरावर आयुक्त महिला व बालविकास-पुणे यांच्या नेमणुका केल्याचे राजपत्रद्वारे जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, महिला व बाल विकास विभाग मंत्रालय, मुंबई अधिसूचना दि. २५ जुलै २०१६ नूसार हुंडा प्रतिबंधक अधिनियत १९६१ च्या कलम ८ (ब) मधील पोट-कलम (१) आणि महाराष्ट्र हुंडा प्रतिबंधक नियम, २००३ च्या नियम-४ सह प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा व त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र शासन याद्वारे खालील नमूद अधिकाऱ्यांची संबंधित क्षेत्रांसाठी हुंडा प्रतिबंधक अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नेमणूक करत आहे. त्यानुसार आयुक्त , महिला व बाल विकास, पुणे यांची महाराष्ट्र राज्य क्षेत्रासाठी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांची संबंधित जिल्हास्तरीय क्षेत्रासाठी तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना संबंधित तालुक्याच्या क्षेत्रासाठी हुंडा प्रतिबंधक अधिकारी म्हणून नेमणूक करीत आहे. हुंड्यास प्रतिबंध करण्याबाबत व अधिक माहितीसाठी जिल्हास्तरावर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, ,२४ गणेश कृपा, शास्त्रीनगर (भाग्यनगरजवळ), नांदेड -४३१६०५ , दुरध्वनी ०२४६२ – २६१२४२ किंवा २६७६०० , फॅक्स – २६१२४२, ईमेल dwcdond@gmail.com येथे संपर्क साधवा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.