HW News Marathi
मुंबई

लोणावळ्यात इंजिनिअर प्रेमी युगलाचा निर्घुण खून

पुणे – लोणावळ्यातील आयएनएस गेटवरील डोंगरावर सॉफ्टवेअर इंजिनिअरींच्या तरुण विद्यार्थी-विद्यार्थीनीची निर्घुण हत्या करण्‍यात आली आहे. दोघांचे मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तीक्ष्ण वस्तूने दोघांच्या डोक्यावर वार करण्‍यात आले आहेत. तरुणीचे हात मागे बांधले होते. तसेच तिच्या तोंडात कापड कोंबला होता. दोघांच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणाही आढळल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

मृत विद्यार्थी एकाच कॉलेजचे

सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आली होती. मृत तरुण-तरुणी पुण्यातील सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजच्या लोणावळा कॅम्पसचे फायनल ईयरचे विद्यार्थी होते. तरुण हा अहमदनगर तर तरुणी ओतूर येथील राहाणारी होती, अशी की माहिती पोलिसांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

Aprna

माहुलवासीयांच्या पुनर्वसनाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष

News Desk

अमिताभ बच्चन यांच्या हस्ते 28वा रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू

News Desk
महाराष्ट्र

…म्हणून सोलापूरात विरोधकांच्या संघर्ष यात्रेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

News Desk

अभिराज उबाळे

– शेतकऱ्यांची देणी थकवणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना समज देऊ – राधाकृष्ण विखेपाटील

पंढरपूर – स्थानिक काँग्रेसच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी जर शेतकऱ्यांची देणी थकवलेली असतील तर हे चुकीचे आहे. सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडे अशी देणी असतील तर आपण त्यांना योग्य समज देऊ असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय. विरोधी पक्षांच्या सोलापूरमधील संघर्ष यात्रेकडे त्यामुळेच शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याची चर्चा सुरू झालीय.

विरोधी पक्ष शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आंदोलनं करत आहेत. मात्र, सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची देणी काँग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी थकवलीत. जिल्हा बँकेची नियमबाह्य कर्ज देखील या नेत्यांनी घेतलेली आहेत. यावर विखे पाटलांना छेडले असता त्यांनी हे दुर्दैव असल्याची कबुली देत, आपण यामध्ये लक्ष घालून हि देणी देण्यास भाग पाडू असे आश्वासन दिले. तसेच शेतकऱ्यांची एफ आर पी थकवणाऱ्यांवर साखर आयुक्तांनी कारवाई करावी असा सल्ला त्यांनी प्रशासनास दिला.

एकीकडे कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी दबलेला आहे. आणि दुसरी कडे शेतकऱ्यांनी आपल्या हक्काचे पैसे मिळत नाहीत. पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे काँग्रेस आमदार भारत भालके यांच्याकडे संघर्ष यात्रेच्या मंगळवेढ्याच्या सभेचे आणि पंढरपूरचे नियोजन होते. मात्र काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देणी थकवल्याने शेतकऱ्यांनी या संघर्ष यात्रेकडे सपशेल पाठ फिरवलीय. एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी कर्ज माफी करण्याची मागणी करतानाच त्यांच्याच नेत्यांकडे देणी थकल्याने सोलापुरात त्यांची चांगलीच गोची झाल्याचे चित्र दिसत आहे . या कारणांमुळे मंगळवेढा आणि पंढरपूर मधून या यात्रेने काढता पाय घेतल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

Related posts

जेईई आणि नीट परीक्षेच्या विद्यार्थाना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिला दिलासा 

News Desk

अजित पवारांना फक्त स्वतःच्या मुलाची चिंता! स्वप्नील लोणकर आत्महत्येवरून गोपीचंद पडळकरांचा घणाघात

News Desk

“मुकेश भैय्या-नीता भाभी, हा तर एक ट्रेलर…” अंबानींच्या ‘अँटिलिया’ बाहेर सापडलेल्या कारमधून मिळाले पत्र

News Desk