HW News Marathi
मुंबई

विवाहितेला ब्लॅकमेल करणारा गजाआड

मुंबई

प्रेयसीचे दुसऱ्याशी लग्न झाल्यानंतरही विवाहबाह्य संबंध ठेवण्यासाठी पूर्वप्रेयसीला ब्लॅकमेल करणाऱ्या 27 वर्षीय आरोपीला खार पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी खार पश्चिमेला राहतो. पीडित महिलाही त्याच भागात राहते. लग्नाआधी दोघांचे प्रेमसंबंध होते. या महिलेचा दुसऱ्या व्यक्तीशी विवाह झाल्यानंतर आरोपी तिला फोन करुन भेटण्यासाठी जबरदस्ती करत होता. भेटायला आली नाहीस तर, लग्नाआधीचा दोघांचा फोटो नवऱ्याला पाठवण्याची धमकीही देत होता. पण या महिलेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. अखेर आरोपीने या महिलेचा स्वतःबरोबरचा फोटो महिलेच्या पतीला व्हॉटस अॅपवर पाठवला. त्यानंतर पीडित महिलेने खार पोलिस स्टेशन गाठले आणि आरोपी विरोधात तक्रार नोंदवली. त्यावर कारवाई करून पोलिसांनी आरोपीला अटक केली असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उल्हानगरमध्ये भोंदू बाबांना संतप्त नागरिकांनी झोडपले; चारही भोंदू पोलिसांच्या ताब्यात

News Desk

घाटकोपरमध्ये मनसेची पोस्टरबाजी, राम कदम यांची उडवली खिल्ली 

swarit

पुण्याच्या राज्यस्तरीय अधिवेशनात रिपब्लिकन पक्षाची ताकद दाखवा

News Desk