HW News Marathi
मुंबई

शेतकरी कर्जमाफीसाठी उत्तरप्रदेश मॉडेलचा अभ्यास – मुख्मयंत्री

मुंबई – उत्तर प्रदेशात झालेल्या कर्जमाफीनंतर देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा का नाही, या विरोधकांच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत उत्तर दिले. उत्तर प्रदेशात करण्यात आलेल्या कर्जमाफीचे नेमके मॉडेल काय आहे, याचा अभ्यास करण्याचे आदेश अर्थ सचिवांना दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले आहे.

सोमवारी पनवेल येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की आत्महत्या करु नका, सरकारचे जगणे हराम करा. त्यावरुन येत्या काळात राष्ट्रवादी हा मुद्दा आणखी तीव्र करणार असल्याचे संकेत पवारांनी दिले

शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यावर विधानसभेत चर्चा झाली. या चर्चेत मुख्यमंत्री म्हणाले, शेतकरी कर्जमाफीसाठी सरकार सकारात्मक आहे. उत्तर प्रदेश सरकारने कर्जमाफीसाठी नेमके कोणते मॉडेल वापरले. एवढा पैसा कसा उभा केला याचा अभ्यास करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. काँग्रेस – राष्ट्रवादीसह विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेवर, त्यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष्य केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

News Desk

लिहून देतो, भाजपला पाठिंबा नाहीच – शरद पवार

News Desk

दारू बंदीच्या विषयावरून विधानसभेत गदारोळ

News Desk