HW News Marathi
मुंबई

श्रीमाणिकप्रभूंच्या जयंतीनिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम- आनंदराज प्रभू

अक्षय घुगे

मुंबई – दत्त संप्रदायात भगवान दत्तात्रयांचे राजयोगी अवतार म्हणून लौकिक असलेल्या श्रीमाणिक प्रभू महाराजांच्या जयंतीचे यंदा द्विशताब्दी वर्ष आहे. सर्व जाती, धर्म, पंथ यांच्यात बंधुत्व, एकता वाढावी या उद्देशाने “सकलमत संप्रदाय” स्थापन करणाऱ्या श्रीमाणिक प्रभूंच्या अलौकीक कार्याचे स्मरण विचारांचे जागरण वर्षभर विविध उपक्रमांच्या माध्यमातून करण्याचे आयोजन संस्थेने माणिकनगर येथे केले आहे.

१९ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०१७ या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यात ११ ते २९ नोव्हेंबर या ११ दिवसात प्रभूमंदिराच्या सुवर्ण शिकजाराव नित्य महाकुंभाभिषेक सोहळा पार पडणार आहे. तसेच या संस्थेमार्फत माणिकपूर गावाचा विकास करण्यात आला आहे. यात माणिक पब्लिक स्कूल, हिंदी व कानडी विद्यालय, इंग्रजी माध्यमातील नर्सरी स्कूल, संगीत विद्यालय, अनाथ व अंध विद्यार्थ्यांसाठी शाळा, वसतीगृह असे अनेक प्रकल्प राबवले आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पेट्रोल ४ रुपयांनी होणार स्वस्त

News Desk

सोशल मीडियावर ‘परतीचा पाऊस, पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून राज ठाकरेंचे मोदी-शहांना फटकारे

News Desk

दोन दिवस धावपट्टी बंद

News Desk