HW News Marathi
मुंबई

सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये प्राचीन बाहुल्यांचे प्रदर्शन संपन्न

कॉलेजच्या अँन्सिएन्ट इंडियन विभागाचा उपक्रम

शुभम देशमाने

मुंबई – ‘बाहुली – डॉल्स अँक्रोस दि ग्लोब’ या संकल्पनेतून सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या अँन्सिएन्ट इंडियन विभागाच्या विद्यार्थ्यांनी प्राचीन भारतातील विविध प्रकारच्या बाहुल्यांचे प्रदर्शन आयोजित केले होते. त्याला विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला.

सेंट झेवियर्स महाविद्यालय परिसरात गेल्या १० आणि ११ जानेवारीला हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या आणि विविध ठिकाणी संग्रहित असलेल्या प्राचीन बाहुल्यांच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या. यात इथिकोप्पा, कठपुली, काचीना अशा विविध नावाजलेल्या बाहुलीची माहिती विशेष देण्यात आली होती. त्याचप्रमाणे विविध आर्ट गॅलरीमधूनही आणलेल्या बाहुल्या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या.

इ.स.पूर्व ८ व्या शतकापासून बाहुल्यांचा कलाप्रकार भारतात अस्तित्वात आहे. त्याची माहिती आजच्या पिढीला व्हावी म्हणून कॉलेजच्या पुरातत्व विभागाने बाहुल्यांच्या विषयावर हे प्रदर्शन आयोजित केले. या बाहुल्यांसंदर्भात माहिती देणारे पुस्तकही लक्षवेधी ठरले. या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना भारताच्या प्राचीन कलाकृतीविषयी माहिती मिळाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डोंबिवलीमध्ये एमआयडीसीतील झेनिथ रबर कंपनीला आग

News Desk

‘अंधेरीच्या राजा’चे आज विसर्जन

News Desk

मराठी उद्योजकांनो स्वत:च्या व्यवसायाचे मार्केटिंग करा- आशिष पेठे

News Desk