HW News Marathi
मुंबई

३७ वर्षीय अमेरिकन नागरिक असलेल्या महिलेने  २७ व्या माळ्यावरून उडी घेऊन केली आत्महत्या 

ठाणे : मुळच्या भारतीय वंशज असलेल्या आणि अमेरिकेत स्थायिक झालेल्या एनआरआय महिलेने ठाण्याच्या कापुरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माजीवाडा परिसरातील रुस्तमजी अथेना इमारतीच्या २७ व्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात आकस्मिक निधनाची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

मृतक हेतल धीरज परमार(३७) ही भारतीय वंशाची आहे. ठाण्याच्या रुस्तमजी अथेना इमारतीत हेतालचे पती धीरज यांचे आई-वडील राहतात. तर धीरज आणि हेतल दोघेही अमेरिकेत कामानिमित्त स्थायिक झाले. त्यांना अमेरिकन नागरिकत्वही मिळाल्याने ते पती-पत्नी अमेरिकेत राहत होते. दरम्यान हेतल हिची आई पुण्यात राहते. तिचे निधन झाल्याची बातमी हेतल हिला मिळाल्यानंतर ती त्वरित अमेरिकेहून विमानाने मुंबई विमानतळावर उतरली. आणि शनिवारी संध्याकाळी ठाण्यात रुस्तमजी अथेना येथे राहत असलेल्या सासू-सासरे यांच्याकडे आली. आईच्या निधनाची बातमीने हेतल विवश होती. तिचा मानसिक समतोल बिघडल्याने ती नैराश्येत होती. आईच्या मृत्यूने नैराश्येखाली असलेल्या हेतलने शनिवारी रात्री रुस्तमजी अथेना इमारतीच्या २७ व्या माळ्यावरून उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेची माहिती मिळताच कापुरबावडी पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी हेतलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. हेतलने आत्महत्या का केली याचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. अत्म्हत्यापूर्वी हेतल ने सुसाईड नोट लिहली होती काय ? याचाही पोलीस शोध घेत असून अद्यापर्यंत काहीच सापडले नसल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. दरम्यान कापुरबावडी पोलिसांनी मात्र हेतल आत्महत्या प्रकरणी आकस्मिक निधनाची नोंद केली असून अधिक तपास पोलीस करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोनोरेलने गाठला १ सप्टेंबरचा मुहूर्त

Gauri Tilekar

कंत्राटदारांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा

swarit

आदित्य ठाकरेंच्या आदेशाने सेना भवनमध्ये प्लास्टिक बंदी !

News Desk