HW News Marathi
मुंबई

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १२ घोषणा

राज्य सरकारने निवडणुकीची तयारी सुरु केली असून त्याची झलक मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या निर्णयावरून दिसून आली. मंत्रिमंडळाने एकाच दिवशी तब्बल १२ ठराव मंजूर केले आहेत. यातील बहुतेक ठराव मतदारांना खुश करण्यासाठी तसेच आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केल्याचे दिसत आहे. अवकाश व संरक्षण क्षेत्र उत्पादन धोरण मंजूर केले आहे.

यामुळे पाच वर्षात 200 कोटी डॉलर गुंतवणुकीसह एक लाख रोजगार निर्माण होईल असा सरकारचा दावा आहे. म्हणजे या सरकाने पुढील पाच वर्ष सत्तेत राहण्याचा निर्धार केला असून त्या दृष्टीने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र वस्त्रोद्योग धोरण 2018 मंजुरी देण्यात आली आहे. वीजदर तसेच मागास भागात विविध सवलतिची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेईकल प्रोत्साहन धोरण देखील मंजूर करण्यात आले आहे. इलेक्ट्रीक व्हेईकलचा दळणवळणासाठी वाढता वापर करण्यास प्रोत्साहन योजना राबवली जाणार आहे.

एकूणच राज्य सरकारने उद्योग व त्यासंबधीच्या अनेक प्रलंबित निर्णयांना मंजुरी देऊन तरुण, उद्याजोकाना खुश करण्याचा प्रयत्न केले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल जुलै 2024 पर्यंत सुरु होणार

News Desk

शितल म्हात्रे यांना धमकावल्या प्ररकणी दोघाना अटक

News Desk

पेट्रोल १५ पैशांनी, डिझेल १४ पैशांनी स्वस्त

News Desk