HW Marathi
मुंबई

साखर कारखाना घोटाळाप्रकरणी चौकशीची अण्णांची मागणी कोर्टाने फेटाळली

  • कारखान्यांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर आदेश देणार

अजय कल्याणे – 8983240034 

मुंबई – राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यात सुमारे 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला असून त्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे केली होती. शुक्रवारी न्यायालयाने अण्णांची याचिका फेटाळत, संबंधित कारखान्यांबाबत आधी तक्रार दाखल करणा त्यानंतर आदेश देऊ असे न्यायालयाने स्पष्ट केले.

सहकारी साखर कारखान्यांमधील या घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासारख्या काही राजकीय नेत्यांचा समावेश असल्याचा गंभीर आरोप हजारे यांनी केला होता. न्यायालयाच्या या निर्णयानंतर अण्णा हजारेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Related posts

राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातील महत्त्वाच्या बाबी

rasika shinde

मुंबईत कांद्याचे दर घसरले, कांद्याची आवक वाढली

News Desk

दोन लोकल ट्रेनसमोरा समोर

अपर्णा गोतपागर