HW News Marathi
मुंबई

दबंग शिवदीप लांडेंची धडक कारवाई

मुंबई बिहार केडरचे मराठमोळे आयपीएस आधिकारी शिवदीप लांडे यांनी मुंबईतही कारवाईचा धडाका सुरू केलाय . शिवदीप लांडे यांची मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथक पोलीस उपायुक्त म्हणुन नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांनी पहिलीच कारवाई केली आहे.

मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं एक किलोचं एमडी ड्रग्ज जप्त केलं आहे. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या १२ नायजेरियन तरुणांना अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

मुंबईतील काही महत्त्वाच्या परिसरांची पाहणी केली होती तसेच गेल्या काही दिवसांत तस्करांवर झालेल्या कारवायांचा आढावा घेतला होता. त्यानंतर ही कारवाई केली आहे.

पोलीस शिपायांच्या मदतीने शिवदीप लांडे यांनी डोंगरी परिसरातून आठ नायजेरियन तस्करांना अटक केली. त्यानंतर विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत ४ नायजेरियन नागरिकांना अटक केली.

बिहारच्या गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण करणा-या शिवदीप लांडे यांच्या नावानेच खाण माफिया, गुंडांच्या मनात धडकी भरते. त्यांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे बिहारमध्ये सर्व सामान्यांमध्ये लोकप्रिय झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वरळी समुद्रात बोट बुडाली, १ जण बेपत्ता

News Desk

गणवेशात भीक मागण्याची परवानगी मागणाऱ्या कॉन्स्टेबलचे निलंबन.

News Desk

मांजर फेकल्याच्या जाब विचारला म्हणून महिलेचा खून

News Desk