HW News Marathi
मुंबई

ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते, दलितमित्र माधवराव सावंत यांचे निधन

मुंबई ज्येष्ठकाँग्रेस कार्यकर्ते आणि दलितमित्र माधवराव सावंत यांचे आज निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांचे ते वडील होते.

माधवराव सावंत यांना 1995 साली दलितमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. रायगड सहकारी बँकेसह विविध सहकारी संस्था त्यांनी उभारल्या. सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल वसंतदादा पाटील पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता. माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांचे ते जवळचे स्नेही होते. रायगड जिल्ह्यात राजकीय आणि सहकारी क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली आणि दोन मुले, नातवंडे व मोठा आप्त परिवार आहे.

सोमवारी 6 मार्च रोजी सकाळी 10 वा. सावंत किटुंबियांचे निवासस्थान 301, सत्यम टॉवर , 90 फुट रोड, एचडीएफसी बँकेच्या मागे, ठाकूर पॉलिटेक्नीक कॉलेज जवळ, ठाकूर कॉम्पलेक्स, कांदिवली पूर्व, मुंबई. येथून अंत्ययात्रा निघेल व दौलतनगर स्मशानभूमी बोरिवली येथे अंतिम संस्कार केले जातील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यंदा गणेशोत्सव मंडळांना पालिकेची परवानगी घेणे बंधनकारक

News Desk

२९ तारीख मुंबईकरांसाठी घातक

News Desk

एलफिस्टन पुलावर चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या नातेवाईकाना पाच लाखाची मदत – विनोद तावडे

News Desk