HW News Marathi
मुंबई

एटीएसने कांदिवलीतून ८ बांगलादेशीना अटक

मुंबई | राज्य दहशतवादीविरोधी पथकाने (एटीएस) कांदिवलीतून आठ बांगलादेशीना अटक केली आहे. अटक केलेल्या सर्व आठ जण १८ ते २२ वयोगटातील आहे. अन्सारूल्ला बांगला टीम (एबीटी) ही दहशतवादी संघटना असून बांगलादेशमध्ये या संघटनेवर बंदी घातली आहे.

अन्सारूल्ला बांगला टीम (एबीटी) या संघटनेचा संबंध ‘अल कायदा’शी असल्यामुळे त्यावर बंदी घालण्यात आली. या संघटनेचे काही सदस्य अनधिकृतरित्या देशात वस्तव्य करत असल्याचे कळाले आहे. त्यामुळे एटीएसने बांगलादेशी नागरिकांना पकडण्यास सरुवात केली आहे.

भविष्यात या संघटना देशासाठी धोकादायक ठरु शकते. या दृष्टीने एटीएस बांगलादेशी नागरिकांना पकडत आहेत. एटीएसने गेल्या दहा दिवसापासून पुणे, महाड आणि अंबरनाथ येथून बांगलादेशी नागरिकांची धडपक सुरु केली आहे. राजू मंडल (३१) याला एटीएसने अटक केले असून एबीटी या दहशतवादी संघटनांशी त्यांचा संबंध असल्याची माहिती मिळाली होती. या महितीच्या आधारावरच राजू मंडला याला एटीएसने अटक केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रागाच्या भरात आईने तीनवर्षाच्या पोटच्या मुलाला फेकले

News Desk

स्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे कोहिनूर | सुधीर मुनगंटीवार

News Desk

राणीच्या बागेतील पेंग्विनच्या पिल्लाचा मृत्यू

swarit