HW News Marathi
मुंबई

शिवाजी पार्कमध्ये कुरियर बॉयचा २ तरुणींवर पेनाने हल्ला

मुंबई | शिवाजी पार्क परिसरात एका बांगलादेशी तरुणाने महिलेवर पेनाने हल्ला केल्याची घटना आज (२२ फेब्रुवारी) घडली आहे. दादर परिसरात राहणाऱ्या दोन महिलांना कुरियर घेऊन आलेल्या बांगलादेशी तरुणाला मराठी भाषा बोलण्याचा आग्रह धरला होता. परंतु या तरुणाने मराठी बोलण्यास विरोध करून या महिलांच्या गालावर हल्ला केला. यामुळे महिला किरकोळ जखमी झाल्या असून शिवाजी पार्क पोलिसांनी या हल्लेखोर बांगलादेशी तरुणाला ताब्यात घेतले आहे.

“मराठी का बोलत नाही? असे विचारल्यावर एका परप्रांतिय तरुणाने शिवाजी पार्क येथे महिलेवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना आज दादरमध्ये घडली. या हल्यात विनीता पेडणेकर (५१) ही महिला जखमी झाली आहे. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात इब्राहिम शेख (२७) तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यवार गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सहायक पोलीस आयुक्त अजिनाथ सातपुते यांनी सांगितले.

नेमके काय आहे प्रकरण

दादरच्या सेनाभवनजवळील एन.सी.केळकर मार्गावरील गुरू कृपा इमारतीत राहणाऱ्या विनीता पेडणेकर यांनी फोरम कुरिअरद्वारे काही पुस्तके मागवली होती. या पुस्तकांची डिलिव्हरी करण्यासाठी आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास आरोपी इब्राहिम शेख गेला होता. त्यावेळी त्याला हिंदी ही व्यवस्थित बोलता येत नव्हते. म्हणून विनीता यांनी शेखला महाराष्ट्रात काम करताना मग तुम्हाला मराठी बोलणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे. परंतु शेखने विनिता यांना उलट उत्तरे दिले. यावेळी विनीता यांची धाकटी बहिण सुजीता पेडणेकर या मध्ये पडल्या असता. इब्राहिमने त्यांच्या डोक्यात बुक्की मारली. ऐवढ्यावरच न थांबता इब्राहिमने अचानक हातातील पेन विनिता यांच्या गालावर ओढला. दोघींनी मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर शेजारी मदतीसाठी धावले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंगावर झाड पडून वकिलाचा मृत्यू

News Desk

महाराष्ट्र दिनानिमित्त एमडीमध्ये उलघडला महाराष्ट्राचा इतिहास

News Desk

मुंबईकरांसाठी नवीन वर्सोवा-बांद्रे सी-लिंक

News Desk