HW News Marathi
मुंबई

आजपासून मुंबईतील सेंट्रल रेल्वे मार्गावर धावणार एसी लोकल!

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात, देशात लॉकडाऊन केला होता. त्यामुळे गेले अनेक महिने लोकल सेवा बंद होत्या. काही काळानंतर हळूहळू लोकल सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. आता आणखी एक बदल होणार आहे तो म्हणजे सेंट्रल रेल्वे मार्गावर एसी लोकल धावणार आहे. आजपासून (१७ डिसेंबर) सीएसएमटी ते कल्याण या मार्गावर एसी लोकल धावणार आहे.

नव्या फेऱ्यांचा समावेश न करता वेळापत्रकातील साध्या लोकलच्या फेऱ्यांऐवजी एसी लोकलच्या दररोज दहा फेऱ्या चालविण्यात येणार आहे. एसी लोकस प्रत्येक स्थानकावर थांबणार आहे.आठवड्यातील सोमवार ते शनिवार या दिवशी एसी लोकल सकाळ-संध्याकाळ धावणार असून, रविवारी मेंन्टेनन्सकरिता लोकल धावणार नाही. एसी लोकलची पहिली फेरी कुर्ल्याहून पहाटे 5.42 वा सुरु होऊन सीएसएमटीला 6.12 वाजता पोहचणार आहे.

दरम्यान, एसी लोकलचा दर फर्स्ट क्लासच्या दरापेक्षा 1.3 पट जास्त असल्याने मध्य रेल्वेच्या एसी लोकलला कसा प्रतिसाद मिळतो ते पाहून लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचा विचार केला जाणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. तसेच लॉकडाऊनमुळे बंद असलेली ट्रान्सहार्बरवरील लोकलही आता लवकरच सुरु करण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डोंबिवलीकरांसाठी खुश खबर , डोंबिवलीतच पासपोर्ट काढु शकता

News Desk

सचिन सावंत हत्येप्रकरणी 7 जणांना अटक  

News Desk

सहायक पोलीस आयुक्तसोबत रिक्षा चालकांची मुजोरी

News Desk