मुंबई – राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं असोशिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स अर्थात एडीआरनं नुकतंच एक अहवाल तयार केलाय. यात राज्यातल्या जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या गुन्हेगारी आणि आर्थिक पार्श्वभूमीचं विश्लेषण करण्यात आलंय. ५० उमेदवारांपैकी ४५ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्राचं विश्लेषण या अहवालात करण्यात आलंय. कारण हा अहवाल बनवेपर्यंत ती संकेतस्थळावर टाकली गेली नव्हती.
जि.प. अध्यक्ष – उपाध्यक्ष यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी
- गुन्हेगारी प्रकरणं असलेले विजेते उमेदवार:४५ विजेते उमेदवारांपैकी ११ (२४%) विजेते उमेदवारांच्या विरोधात गुन्हेगारी प्रकरण दाखल आहे.
- गंभीर गुन्हेगारी प्रकरण असलेलेविजेते उमेदवार: ४५ विजेते उमेदवारांपैकी ९ (२४%) उमेदवारांनी त्यांच्या विरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे घोषित केले आहे ज्यामध्ये खून, खूनचा प्रयत्न, अपहरण, दादागिरी, फसवणूक, इत्यादी गुन्ह्यांचा समावेश आहे.
- खून आणि हत्येचा प्रयत्न संबंधित प्रकरणे घोषित केलेले विजेते उमेदवार: श्यामउर्फ विनोद द्वारकाप्रसाद जैस्वाल हेबीजेपी मधून निवडून आलेले उपाध्यक्ष असून असोला-तळेगाव, जिल्हा परिषद यवतमाळ यांनी खून, खुनाचा प्रयत्न, अपहरणया संबांधित प्रकरणे असल्याचे त्यांच्या शपथ पत्रात नमूद आहे.
- गुन्हेगारी प्रकरणं दाखल असलेले पक्षवार विजेते उमेदवार:रा.कॉ.पच्या १३ विजेते उमेदवारांपैकी ३ (२३%), भाजपच्या १२विजेते उमेदवारांपैकी ३ (२५%), शिनसेने च्या ९ विजेते उमेदवारांपैकी १ (११%) आणि काँग्रेस च्या ६ विजेते उमेदवारांपैकी १ (१७%)विजेते उमेदवारांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे
- गंभीरगुन्हेगारी प्रकरणं दाखल असलेले पक्षवार विजेते उमेदवार: रा.कॉ.पच्या १३ विजेते उमेदवारांपैकी २ (१५%), भाजप च्या१२ विजेते उमेदवारांपैकी ३ (२५%), शिवसेने च्या ९ विजेते उमेदवारांपैकी १ (११%) आणि काँग्रेस च्या ६ विजेते उमेदवारांपैकी १ (१७%)विजेते उमेदवारांनी त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
- जिल्हा परिषद नुसार गुन्हेगारी प्रकरण घोषित केलेले विजेते उमेदवार:जिल्हा परिषद सोलापूरच्या २ विजेते उमेदवारांपैकी २ (१००%) आणि जिल्हा परिषद उस्मानाबाद च्या, जिल्हा परिषद वर्धा, जिल्हा परिषद जालना , जिल्हा परिषदऔरंगाबाद, जिल्हा परिषद नांदेड, जिल्हा परिषद रायगड, जिल्हा परिषद रत्नागिरी, जिल्हा परिषद यवतमाळ आणि जिल्हा परिषद बीड येथील २ विजेते उमेदवारांपैकी १ (५०%) विजेते उमेदवारांनी त्यांच्या शपथ पत्रात गुन्हेगारी प्रकरण असल्याचे घोषित केले आहे.
- जिल्हा परिषद नुसार गंभीर गुन्हेगारी प्रकरण घोषित केलेले विजेते उमेदवार:जिल्हा परिषद सोलापूर , जिल्हा परिषद वर्धा,जिल्हा परिषद जालना, जिल्हा परिषद औरंगाबाद, जिल्हा परिषद नांदेड, जिल्हा परिषद रायगड, जिल्हा परिषद रत्नागिरी, जिल्हा परिषद यवतमाळ आणि जिल्हा परिषद बीड येथील २ विजेते उमेदवारांपैकी १ (५०%), विजेते उमेदवारांनी त्यांच्या शपथ पत्रात गंभीर गुन्हेगारी प्रकरण असल्याचे घोषित केले आहे.
जि.प. अध्यक्ष – उपाध्यक्ष यांची आर्थिक पार्श्वभूमी
- कोट्यधीश विजेते उमेदवार:विश्लेषित केलेल्या ४५ विजेते उमेदवारांपैकी २६ (५८%) विजेते उमेदवार कोट्यधीश आहेत.
- पक्षवार कोट्यधीश विजेते उमेदवार:रा.कॉ.पच्या १३ विजेते उमेदवारांपैकी ९ (६९%), भाजप च्या १२ विजेते उमेदवारांपैकी ६ (५०%),शिवसेने च्या ९ विजेते उमेदवारांपैकी ५ (५६%) आणि काँग्रेस च्या ६ विजेते उमेदवारांपैकी २ (३३%) कोट्यधीश आहेत.
- जिल्हा परिषद नुसार कोट्यधीश विजेते उमेदवार:जिल्हा परिषद सोलापूर, जिल्हा परिषद कोल्हापूर, जिल्हा परिषद बीड,जिल्हा परिषद परभणी, जिल्हा परिषद पुणे, जिल्हा परिषद औरंगाबाद, जिल्हा परिषद जालना प्रत्येकी २ विजेते उमेदवारांपैकी२(१००%); जिल्हा परिषद जळगाव, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, आणि जिल्हा परिषद अहमदनगर प्रत्येकी १ विजेते उमेदवारांपैकी१ (१००%); जिल्हा परिषद नाशिक, जिल्हा परिषद सातारा, जिल्हा परिषद यवतमाळ, जिल्हा परिषद बुलढाणा, जिल्हा परिषदनांदेड, जिल्हा परिषद सांगली, जिल्हा परिषद उस्मानाबाद, जिल्हा परिषद रत्नागिरी, जिल्हा परिषद रायगड प्रत्येकी २ विजेते उमेदवारांपैकी १ (५०%) कोट्यधीश आहेत.
- सरासरी मालमत्ता:या निवडणूकीतील विजेते उमेदवारांकडील सरासरी मालमत्ता रु ५.७८ करोड इतकी आहे.
- उच्चत्तममालमत्ता: संजय विठ्ठलराव शिंदे हे जिल्हा परिषद सोलापुर (कुरदू) मधील अपक्ष विजेते उमेदवार असून रू. ४३ कोटी पेक्षा जास्त मालमत्ता असल्याचे घोषित केले आहे.
- शून्य मालमत्ता :वसंतराव ज्ञानदेव मानकुमारे हे रा.कॉ.पचे म्हसवे (जिल्हा सातारा) येथील विजेते असून या निवडणुकीत शून्य मालमत्ता असल्याचे घोषित केले आहे.
- कमी मालमत्ता: या निवडणूकीत १ विजेतेशिवरानी प्रकाश नरवाडे हे शिवसेने चे शेवाळा (जिल्हा हिंगोली) येथील विजेते असून यांनी रु.३ लाख पेक्षा कमी मालमत्ता असल्याचे घोषित केले आहे.
- उच्चदेणगी घोषित करणारे विजेते उमेदवार: संजय विठ्ठलराव शिंदे हे अपक्ष चे जिल्हा परिषद सोलापुर (कुरदू) मधील विजेतेउमेदवार असून
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.