HW News Marathi
मुंबई

रेल्वे कर्मचाऱ्यांना खूशखबर ,केंद्र सरकारकडून दिवाळीचा बोनस जाहीर

मुंबई | केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांना खूशखबर दिली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना दसरा आणि दिवाळीचा बोनस जाहीर झाला असून केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा पगार बोनस म्हणून देण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असून दसऱ्याच्या आधी बोनसची रक्कम खात्यात जमा व्हावी अशी त्यांची अपेक्षा आहे. मात्र रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या राजपत्रित अधिकाऱ्यांना या बोनसचा लाभ मिळणार नाही. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे रेल्वेवर २ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

दरवर्षी दसऱ्याला रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो. मात्र त्यात राजपत्रित अधिकाऱ्यांचा समावेश केला जात नाही. तसेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स यांचा समावेश केला जात नाही. रेल्वेचे एकूण ११.३१ लाख कर्मचारी आहे. यातील अनेक कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन ७ हजार रुपये आहे. त्यामुळे सुमारे १८ हजार रुपयांचा बोनस या कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो. २०११ पासून नवरात्री आणि दसऱ्याच्या वेळी रेल्वे हा बोनस देते आहे. सलग सातव्या वर्षी रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस देण्याची घोषणा केली आहे, अशी माहिती मिळत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नाशिकमध्ये मनसेने आपला बालेकिल्ला राखून ठेवला

News Desk

हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये ‘हेरिटेज वॉक’ सुरू

Aprna

मुंबईकरांचे पाणी महागले

News Desk
महाराष्ट्र

‘हिमालयीन गिफ्रॉन’ प्रजातीच्या गिधाडाची अखेर सुटका

Gauri Tilekar

मुंबई | ‘रे रोड’ जवळ आठ महिन्यांपूर्वी अर्धमेल्या अवस्थेत आढळलेल्या ‘हिमालयीन गिफ्रॉन’ जातीच्या गिधाडाची आज सुटका करण्यात आली. हिमालय पर्वतरांगांत आढळणाऱ्या आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले ‘हिमालयीन गिफ्रॉन’ जातीचे गिधाड आठ महिन्यांपूवी रे रोड येथे अर्धमेल्या अवस्थेत आढळले होते. एका हौशी पक्षिमित्राने या गिधाडाचा सांभाळ करून त्याच्यावर उपचार केले. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने आज वनविभागाच्या मदतीने या गिधाडाला नाशिकच्या जंगलात सोडण्यात आले आहे.

‘विषबाधा आणि अपुऱ्या खाद्यामुळे हे गिधाड अशक्त झाले होते. मात्र, प्रतिजैविके आणि योग्य आहार यांच्या माध्यमातून त्याचा सांभाळ करण्यात आला. मध्यंतरी त्याच्या शरिरात जंतू निर्माण झाल्याने त्याची पिसे मोठय़ा प्रमाणात झडली. मात्र, आता हे गिधाड तंदुरुस्त झाले आहे,’ असे डिसुझा यांनी सांगितले. बुधवारी वन विभागाच्या मदतीने गिधाडांसाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकच्या हरसुळ जंगलात त्याची सुटका करण्यात आली असल्याचे मुंबईचे वन परिक्षेत्र अधिकारी संतोष कंक यांनी सांगितले.

महाराष्ट्रात गिधाडांच्या अनेक प्रजातींची नोंद असली तरी पांढऱ्या पुठ्ठय़ाची, लांब चोचीची आणि पांढरी गिधाडे १९९० आणि त्यापूर्वी मोठ्या संख्येने आढळत होती. गिधाडांची संख्या देशभरात कोलमडल्यानंतर महाराष्ट्रातील गिधाडेसुद्धा दिसेनाशी झाली. त्यामुळे त्यांचा समावेश ‘नष्टप्राय श्रेणी’ तील पक्ष्यांच्या यादीत करण्यात आला. परिणामी वाढते शहरीकरण आणि अपुऱ्या खाद्य पुरवठ्यामुळे राज्यात आढळणारी गिधाडेदेखील मुंबईतून हद्दपार झाल्याची शक्यता वन्यजीव अभ्यासक विजय अवसरे यांनी वर्तवली.

मात्र प्रामुख्याने उत्तर भारतात आढळणारे आणि भारतातील गिधाडांच्या प्रजातीमधील सर्वात मोठे हिमालयीन ग्रिफॉन गिधाड फेब्रुवारी महिन्यात पक्षिमित्र प्रदीप डिसुजा यांना रे रोड स्थानक परिसरात जखमी अवस्थेत सापडले होते. फोर्ट परिसरातील १०० वर्षे जुन्या क्वीन मेन्शन इमारतीच्या गच्छीवर डिसुजा यांनी आपल्या परिवाराच्या मदतीने पक्षी निवारा केंद्र उभारले आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने घार, घुबड, वटवाघुळ पक्षी आसऱ्यास आहेत. लोखंडी पिंजऱ्याला डिसुजा यांनी खुले दार ठेवल्याने या पक्ष्यांना केव्हाही आकाशात भरारी मारण्याची मोकळीक मिळते. या ठिकाणी डिसुजा यांनी गिधाडावर आठ महिने त्याच्यावर उपचार केले.

हिमालयीन ग्रिफॉन गिधाड मुंबईत आढळल्याचा योग दुर्मीळ असल्याचे ‘बीएनएचएच’च्या पक्षी अभ्यासक तुहिना कट्टी यांनी सांगितले. पक्षी स्थलांतराचा अभ्यास सुरू आहे. यासाठी पक्ष्याच्या पायांवर विशिष्ट सांकेतिक क्रमांकाची किंवा प्रदेशानुरूप ठरलेल्या रंगाची रिंग लावली जाते; जेणेकरून भविष्यात हा पक्षी आढळ्यास रिंगवरील सांकेतिक क्रमांकानुसार त्याच्या स्थलांतराच्या पट्टय़ाची माहिती मिळेल, असे त्या म्हणाल्या आहेत.

दररोज अर्धा किलो मांसभक्षण

तीन फूट उंचीच्या या गिधाडाच्या पंखांचा व्यास सात फूट रुंद इतका आहे. अर्धमेल्या अवस्थेत सापडले तेव्हा या गिधाडाचे वजन साडेतीन किलो होते. मात्र, आता त्याचे वजन आठ किलोवर पोहोचले आहे. हा पक्षी दररोज अर्धा किलो म्हशीचे मांस भक्षण करतो, अशी माहिती डिसुझा यांनी दिली.

 

Related posts

शिवसेना-राणेंमध्ये वाद मात्र फडणवीस-मुख्यमंत्र्याची बंद दाराआड चर्चा!

News Desk

नागपूरच्या अल्पवयीन मुलीवर रायपूरमध्ये बलात्कार

News Desk

पुणे पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्या जागी विक्रम कुमार नवे पालिका आयुक्त

News Desk