HW News Marathi
मुंबई

प्रजा फाउंडेशन तर्फे आमदारांचे वार्षिक कार्य अहवाल प्रकाशित

मुंबई | प्रजा फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने आज मुंबईतील आमदारांचे वार्षिक कार्य अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार आपल्या आमदारांचे कार्यप्रदर्शन दिवसेंदिवस घटत आहे. मुंबईतील आमदारांची सरासरी गुणसंख्या २०१६ च्या ६५.११ टक्क्यांच्या तुलनेत २०१८ मध्ये ५९.३३ टक्के इतकी कमी नोंदविण्यात आली.

या वर्षीचा कार्य अहवाल आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांसाठी महत्वाचा आहे. अहवालातील माहितीनुसार सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांची सरासरी गुणसंख्या ५८ टक्के इतकी आहे. तुलनेने प्रजा फाउंडेशनने प्रकाशित केलेल्या ४ कार्य अहवालांमध्ये गेल्या वेळी सत्ताधारी असणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची सरासरी गुणसंख्या ६२ टक्के इतकी होती.

या अहवालाबाबत माहिती देताना प्रजा फाउंडेशनचे संचालक मिलिंद म्हस्के यांनी सांगितले की, आम्ही अगदी पद्धतशीरपणे राज्य विधानसभेत आपले प्रतिनिधित्व करत असणाऱ्या आपल्या आमदारांच्या कार्य प्रदर्शनाचा मागोवा घेत असतो. आमदारांच्या वार्षिक कार्य अहवालाच्या क्रमवारीसाठी आम्ही त्यांच्या चर्चेतील सहभाग, त्यांच्यावरील गुन्हे, लोकांचे समज या बाबतच्या माहितीचे विश्लेषण केले आहे. कार्य अहवालातून आम्ही मुंबईतील ३२ आमदारांचे कार्य प्रदर्शन प्रकाशित केले आहे. त्यानुसार आत्ताच्या बहुतेक आमदारांची सरासरी गुणसंख्या सुरुवातीच्या वर्षात ६५.११ करा टक्क्यांवरून ५९.३३ टक्के इतकी घसरली आहे.

या अहवालानुसार आमदारांच्या विधानसभा सभागृहातील उपस्थितीचे ही विश्लेषण करण्यात आले आहे. जी गेल्या वर्षाच्या तुलनेत १०.६३ टक्क्यांनी भेटली आहे. याशिवाय २०१८ मध्ये मुंबईतील ४४ टक्के म्हणजे सोळा आमदारांवर आरोप पत्र नोंदविण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आठ टक्क्यांची वाढ आहे. यावरून लक्षात येते की गुन्हेगारीमुक्त राजकारणाचे लोकांची स्वप्न अजूनही पूर्ण होऊ शकत नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘सामना’चा वापर फक्त वडापावाचे तेल काढण्यासाठी बॅनरमधून राष्ट्रवादीचा हल्ला बोल

News Desk

Breaking News | वरळीतील साधना मिल कम्पाउंडला भीषण आग

News Desk

आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, कल्याण ते अंबरनाथदरम्यान पॉवरब्लॉक

News Desk