HW Marathi
मुंबई राजकारण विधानसभा २०१९

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का, अवधूत तटकरे शिवबंधनात

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती अद्याप सुरूच आहे. आता राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का बसला. राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांचे पुतणे आणि श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत सोमवारी (९ सप्टेंबर) अखेर हाती शिवबंधन बांधले आहे. मुंबईत मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नुकताच अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अवधूत तटकरे यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरु होती.

अवधूत तटकरे यांनी २९ ऑगस्ट रोजी मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. अवधूत तटकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर अवधूत तटकरे यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यावेळी येत्या २ दिवसांत आपली स्पष्ट भूमिका करणार असल्याचे अवधूत तटकरे यांनी म्हटले होते. दरम्यान त्यापूर्वी भाजप नेते प्रसाद लाड यांनी एक सूचक वक्तव्य करत तटकरेंच्या पक्षबदलाचे संकेत दिले होते. “कोणतरी तटकरे प्रवेश करणार आहेत पण भाजपमध्ये कि शिवसेनेत ते सांगता येत नाही”, असे प्रसाद लाड म्हणाले होते.

Related posts

मी बाबरी मशीद पाडण्यासाठी गेले होते | साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर

News Desk

#MaharashtraResult2019 : विधानसभा निवडणुकीतील विजयी आमदारांची संपूर्ण यादी

News Desk

डोंबिवलीकरांसाठी खुश खबर , डोंबिवलीतच पासपोर्ट काढु शकता

News Desk