HW News Marathi
मुंबई

कामा कामतही नंबर वन

मुंबई | मुंबईतील सर्वोत्कृष्ट रुग्णालय होण्याचा मान सीएसटी च्या कामा रुग्णालयाने पटकावला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सरकार कडून दिल्या जाणा-या रुग्णालयाच्या निधीचा वापर योग्य प्रकारे केल्यामुळे कामा सर्वोत्कृष्ट ठरले आहे. महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत आमदारांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. ३५ आमदारांच्या या समितीने मुंबईतील सरकारी व पालिकेच्या रुग्णलयांचे सर्वेक्षण केल्यानंतर कामा रुग्णालयाची सर्वोत्कृष्ट रुग्णालय म्हणून निवड केली आहे.

स्वच्छ परिसर, रुग्णांची नियमित देखभाल, स्वच्छ वॉर्ड या आणि याच्यासह अनेक कारणांसाठी कामा रुग्णालयाची समितीने सर्वोत्कृष्ट रुग्णालय म्हणून निवड केली आहे. २००८ साली झालेल्या अतिरेकी हल्लानंतर कामा रुग्णालयात अनेक बदल करण्यात आले आहेत. १३१ वर्षे जुन्या असलेल्या या रुग्णालयात रुग्णांना प्रसंन्न वाटावे या करता अनेक बदल करण्यात आले आहेत.

सध्या रुग्णालयात महिलांसाठी प्रसूतीगृह, सोनोग्राफी केंद्र, बाह्यरुग्ण विभाग तसेच कॅन्सर ग्रस्त महिलांसाठी पॅप स्मिअर व मॅमोग्राफी चाचण्याही उपलब्ध केल्या आहेत. आरोग्याच्या दृष्टीने आधुनिक सोई सुविधा रुग्णालयात नव्याने आणल्या आहेत त्यामुळे रुग्णालयाला हा मान देण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी

News Desk

ब्रेकिंग | माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांची आत्महत्या

News Desk

‘टेक गणेशा’ स्पर्धा ठरणार टेक्नोप्रेमींसाठी सुवर्णसंधी

News Desk