HW News Marathi
मुंबई

बेस्ट कर्मचाऱ्यांना पालिकेची दिवाळी भेट

बेस्ट कर्मचाऱ्यांना मिळणार ५ हजार ५०० चा बोनस

मुंबई – बेस्ट कर्मचाऱ्यांना साडे पाच हजाराचा बोनस जाहीर करून, महापालिकेने बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट दिली आहे. याचा फायदा बेस्टच्या ४१ हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे. त्यामुळे शनिवारी बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारेला संप आत होणार नाही. कर्मचारी संघटना आणि महापालिका प्रशासन यांच्या आज बोनस बाबत महापालिका मुख्यालयात बैठक झाली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना शनिवार पासून बेस्ट कर्मचारीही शनिवारपासून संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला. मात्र कर्मचारी संघटना आणि पालिका प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत अखेर तोडगा निघाला. त्यामुळे होवू घातलेला संप आता टळला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आता सुटकेचा निश्वास टाकला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

धक्कादायक | 5 लाख भारतीयांचा FB डेटा लीक

News Desk

मध्य रेल्वेच्या वाहतुकीला ब्रेक, वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल

News Desk

संविधानाला हात लावाल तर खबरदार; देशातील विरोधीपक्ष नेत्यांचा संविधान बचाव रॅलीत इशारा

swarit
महाराष्ट्र

कर्जमाफीचा पहिला हफ्ता 18 ऑक्टोबरपासून

News Desk

मुंबई शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी सुरु आहे. 18 ऑक्टोबर, 2017 पासून कर्जमाफीचा पहिला हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. या कर्जमाफीचा फायदा राज्यातील गरजू शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली . जालना तालुक्यातील कडवंची या गावातील सिमेंट नाला बंधाऱ्याची पहाणी व जलपूजन मुख्यमंत्री श्फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शासकीय योजना यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. शासन, लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्या माध्यमातून गावाचा कसा विकास, कायापालट होतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे कडवंची हे गाव आहे. कडवंचीच्या ग्रामस्थांनी अत्यंत मेहनतीमधून गावात जलसंधारणाची कामे केली आहेत. या गावाची आदर्श गाव म्हणून सर्वत्र ओळख निर्माण झाली आहे. कडवंचीचा आदर्श इतर गावांनींही घेऊन गावात जलसंधारणाची कामे करावीत, यासाठी शासनामार्फत सर्वतोपरी मदत केली जाईल. शाश्वत शेतीच्या अभावामुळेच शेतकरी अडचणीत आहेज. शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी विकेंद्रीत पाणीसाठे निर्माण करुन शेतकऱ्याच्या शेतीला शाश्वत सिंचन मिळाल्यास शेतकरी निश्चित समृद्ध होऊ शकतो, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून शासन प्रयत्न करीत आहे. गटशेती ही नवीन योजना तयार करण्यात आली आहे. शेतीक्षेत्रात यापूर्वी गुंतवणूक होत नव्हती परंतु राज्य शासनाने या क्षेत्रात 25 हजार कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक वाढवलेली आहे. देशातील द्राक्षे व डाळींबाला परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. जालना जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जात आहे. तसेच ड्रायपोर्ट हा प्रकल्प साकारला जात आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या फळपिकांना या प्रकल्पाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात नक्कीच परिवर्तन होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तयार करण्यात आलेल्या पुस्तिका व सीडीचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

Related posts

दिलासादायक ! औरंगाबादमध्ये आज आणखी ६ जण कोरोनामुक्त

News Desk

‘मुख्यमंत्री सहायता निधी’ला दोन दिवसांत १२ कोटी ५० लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

swarit

कॉंग्रेस-राष्ट्रवादीला राज्यपालांनी सत्तास्थापनेचे निमंत्रण द्यावे !

News Desk