मुंबई। भिवंडी येथील शांतीनगर परिसरातील एक चार मजली इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या चार जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. तर दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत अजून आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेतील जखमींवर इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच परिसरामध्ये बचावकार्य सुरू आहे.
Maharashtra: Rescue operations continue at the building collapse site in Bhiwandi. The incident has claimed lives of 2 people so far. pic.twitter.com/hSLXoVlmn5
— ANI (@ANI) August 24, 2019
मिळालेल्या माहितीनुसार, शांतीनगर भागात पिरानीपाडा येथील सिटी लाईट्स हॉटेलच्या मागे, मतलो सरदार ऑफीसजवळ असलेली इमारात काल (२३ ऑगस्ट) रात्री उशिरा अडीच वाजताच्या सुमारास इमारत कोसळली. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, अग्नीशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत चार जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. तर दोघांचा मृत्यू झाला असून काही जण अडकल्याचे सांगण्यात येत आहे.
#UPDATE: 2 dead and 5 injured in the Bhiwandi building collapse. Rescue operations underway. https://t.co/Q3CmwdM95K
— ANI (@ANI) August 24, 2019
घटनास्थळी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे. घटनास्थळी मनपा आयुक्त, तहसीलदार, पोलीस उपायुक्त घटनास्थळी उपस्थित आहेत. सदरची इमारत फक्त सहा वर्ष जुनी आहेत. मुन्नवर अन्सारी या बिल्डरने ती इमारत बांधली असून ती अनधिकृत इमारत असल्याची माहिती मनपा सूत्रांकडून मिळत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.