HW News Marathi
मुंबई

आयात उमेदवाराच्या जिवावर भाजपचा भांडूपमध्ये विजय

पुण्याचा भाजपने जागा राखली

कोल्हापूरात ताराराणी आघाडीची सरशी

मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ११६ च्या पोटनिवड़णूकीत भाजप उमेदवार जागृती पाटील या विजयी झाल्या आहेत. विशेष म्हणजे जागृती पाटील या मुळ काँग्रेसी आहेत. काँग्रेसच्या नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या जागृती या सुनबाई आहेत. प्रमिला पाटील यांच्या निधनामुळे या वार्डमध्ये पोटनिवडणूक लागली होती. ही संधी साधत भाजपने प्रमिला यांच्या सुनबाई जागृती यांनी पक्षात प्रवेश देवून त्यांनी उमेदवारीही दिली. भाजपची ही रणनिती भलतीच यशस्वी ठरली.

जागृती पाटील यांनी शिवसेना उमेदवार मिनाक्षी पाटील यांचा तब्बल ४ हजार ८९२ मतांनी परभव केला. मिनाक्षी पाटील या स्थानिक आमदार अशोक पाटील यांच्या पत्नी आहेत. ही निवडणूक शिवसेनेसह भाजपनंही प्रतिष्ठेची केली होती. दरम्यान या विजयामुळे भाजपचे महापालिकेतील संख्याबळ १ नं वाढून ८२ झाले आहे. शिवसेनेचे सध्या ८२ नगरसेवक आहेत.

 

कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये झालेल्या पोटनिवडणूकीत ताराराणी आघाडीचे रत्नेश शिरोळकर यांनी राष्ट्रवादीच्या राजू लाटकर यांचा २०० मतांनी पराभव केला. शिरोळकर यांना १ हजार ३९९ तर लाटकर यांनी १ हजार १९९ मतं मिळाली. तर पुणे महापालिकेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणूकीत भाजपच्या हिमाली कांबळे यांनी विजय मिळवला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

म्हाडाच्या कोकण विभागीय लॉटरीची आज सोडत

News Desk

अल्पवयीन मुलावर १५ मित्रांकडून लैंगिक अत्याचार

News Desk

एलबीएस मार्गाच्या रुंदीकरणात १७०० दुकानदार रस्त्यावर

Gauri Tilekar