HW News Marathi
मुंबई

मुंबईकरांना मिळणार साताऱ्यातील ‘माण’ तालुक्याचा अनुभव

माण | सातारा जिल्ह्यातील एक दुष्काळी भाग. या भागातील महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने आणि महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी माणदेशी फाऊंडेशनची स्थापना झाली. दरवर्षी माणदेशी फाऊंडेशन संस्थेचा “माणदेशी महोत्सव” मुंबईमध्ये भरविला जातो. माणदेशी महोत्सवाचे मुंबईतील यंदाचे तिसरे वर्ष आहे. यंदा ३ जानेवारी ते ६ जानेवारी २०१९ “माणदेशी महोत्सव” रविंद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात भरणार आहे. जेष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अभय बंग, जेष्ठ समाजसेविका डॉ.श्रीमती सिंधुताई सपकाळ, उद्योगमंत्री सुभाष देसाई प्रमुख पाहुणे म्हणून महोत्सवात सहभागी होणार आहे. गावाकडील संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मुंबईकरांनी या महोत्सवात येऊन आनंद घ्यावा अशी माहिती माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी दिली.

काय आहे यंदा माणदेशी महोत्सवामध्ये पाहण्यासाठी

प्रत्यक्षात साताऱ्यातील माण गाव मुंबईकरांच्या भेटीला आले आहे असा अनुभव यावा म्हणून गावकडची संस्कृती दाखविणारा देखावा उभारणार आहे. गावाकडचे दिपस्तंभ, किल्ले, गावाची चावडी, घराचा ओटा, घरासमोरील पडवी, गुरे-ढोरे या सर्वाचा अनुभव सेल्फी पॉंईटमधून मुंबईकरांना घेता येणार आहे. यंदा सुरवात होतेय ती माणदेशी महोत्सवाच्या प्रवेश द्वारापासून, गावाकडील संस्कॄती, आणि विविध स्कल्प्चर्सचा देखावा पाहता येणार आहे. मुंबईकरांना महोत्सवामध्ये माणदेशाची खासियत असलेले माणदेशी जेन, घोंगडी, दळण्यासाठी जाती व खलबत्ते, केरसुण्या, दुरड्या, सुपल्या, हे साहित्य व माणदेशी माळरानातली गावरान ज्वारी, बाजरी, देशी कडधान्य, तसेच चटकदार चटण्या व मसाल्यांची चव चाखता येणार आहे. यंदा मसाले तुम्हाला स्वतः तयार करता येणार आहेत.

कारण जात्याच्या उपयोग करुन तुम्हाला मसाले स्वतः देखील करता येणार आहेत. या वर्षी माणदेशी महोत्सवात ९० ग्रामीण उद्योजक आपल्या उत्पादनांद्वारे सहभागी होणार आहेत. त्याचसोबत घरच्या घरी तयार केलेल्या खास सातारी टच असलेल्या विविध चटण्या, पापड, लोणचं, खर्डा, ठेचा, शेव-पापड ते अगदी पेयांपर्यंत सारं काही उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे हातमागावरच्या आणि हाताने कलाकुसर केलेल्या शाली, साड्या, दुपट्टे, ब्लाऊज, ड्रेस मटेरिअल्स देखील खरेदी करता येणार आहे. यावर्षी बिहार येथील मधुबनी, खणाच्या साड्या, कसुती वर्क आणि कलकत्ता येथील कारागीरांना देखील महोत्सवासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोशल मीडियावर ‘परतीचा पाऊस, पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून राज ठाकरेंचे मोदी-शहांना फटकारे

News Desk

राज्य महिला आयोगाकडून ‘सुहिता’ महिलांसाठी हेल्पलाइन

swarit

फेरीवाला हटाव मोहीमेवरून काँग्रेस मनसेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

News Desk