HW Marathi
मुंबई

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक

मुंबई । रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरील सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि इतर पायाभूत कामे करण्यासाठी आज (११ ऑगस्ट) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रुझ ते गोरेगाव धिम्या मार्गावर ब्लॉक वळविण्यात आली आहे. त्यामुळे राम मंदिर स्थानकावर लोकलला थांबा नसणार आहे. ब्लॉकमुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू असणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत.

मध्य रेर्ल्वेवर आज सकाळी ११.२० ते दुपारी ३.५० वाजेपर्यंत कल्याण ते ठाणे – सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे कल्याण ते ठाणेदरम्यान जलद लोकल धिम्या मार्गावर धावतील. सकाळी १०.१६ ते दुपारी ३.२२ वाजेपर्यंत सीएसएमटीहून कल्याण दिशेकडे जाणा-या जलद लोकल संबंधित थांबा घेत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकांवर थांबा घेतील.

हार्बर मार्गावरील सीएसएमटीहून चुनाभट्टी- वांद्रे दिशेकडे आज सकाळी ११.४० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत तसेच चुनाभट्टी-वांद्रेहून सीएसएमटी दिशेकडे सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत एकही लोकल धावणार नाही. याचप्रमाणे सीएसएमटी-वडाळा रोडहून वाशी- बेलापूर-पनवेल दिशेकडे सकाळी ११.३४ ते दुपारी ४.२३ वाजेपर्यंत आणि पनवेल-बेलापूर-वाशीहून सीएसएमटी दिशेकडे सकाळी ९.५३ ते दुपारी २.४४ वाजेपर्यंत एकही लोकल धावणार नाही. सीएसएमटीहून वांद्रे-गोरेगाव दिशेकडे जाणा-या लोकल सकाळी ९.५६ ते दुपारी ४.१६ वाजेपर्यंत तर, गोरेगाव- वांद्रेहून सीएसएमटी दिशेकडे जाणा-या लोकल सकाळी १०.४५ ते दुपारी ४.५८ वाजेपर्यंत रद्द केल्या जातील. ब्लॉककाळात पनवेल ते कुर्ला मार्गावर विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रुझ ते गोरेगावदरम्यान आज सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत पाच तासांचा जम्बोब्लॉक असेल. ब्लॉककाळात धिम्या मार्गावरील लोकल सांताक्रुझ ते गोरेगावदरम्यान जलद मार्गावर धावतील. विलेपार्ले स्थानकावरील फलाट क्रमांक ५ व ६ ची लांबी कमी असल्याने येथे लोकलला दोनदा थांबा दिला जाईल.

Related posts

सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये प्राचीन बाहुल्यांचे प्रदर्शन संपन्न

News Desk

गोखले पूल दुर्घटनेला रेल्वे-पालिका नक्की जबाबदार कोण ?

News Desk

शेतकऱ्यांचा लाल सागर मुंबईत धडकला, सरकारची धावपळ सुरू

News Desk