HW News Marathi
मुंबई

रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो त्यामुळे रक्तदान करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई | राज्यात आजपासून ३१ मार्चपर्यंत १४४ कलम अर्थात जमानबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु तराही काही लोक हे घराबाहेर येत आहेत. त्यांना घरातच थांबण्याचे आवाहन आज पुन्हा एकदा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मीडियालाही त्यांनी आवाहन केले की प्रत्यक्ष भेटीपेक्षा आपणही डिजीटल माध्यमाचा वापर केला पाहिजे. त्यामुळे मी देखील फेसबुक लाईव्ह आणि व्हॉट्सएपच्या माध्यमातून सगळ्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करेन. तसेच, तुमच्या सर्व प्रश्नांची ही उत्तरे देण्याचा प्रयत्न मी या डिजीटल माध्यमातून करेन, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात भविष्यकाळात रक्ताचा तुटवडा होण्याची चिंता दिसत आहे त्यामुळे रक्तदान करणेही तितकेच गरजेचे आणि महत्त्वाचे आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरे भरवणे शक्य नसल्याकारणाने लोकांनी जसे जमेल तसे रक्तदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच, रक्तदान केल्याने कोरोनाचा संसर्ग होतो असा गैरसमज मुळात बाळगू नका, अशी महत्त्वाची माहितीही यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिली. दरम्यान, १४४ कलमाचे जे कुणी पालन करणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही टोपे यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“केळ्याची साल सहा महिन्यांपूर्वी कोणी टाकली?”, घसरत्या GDPवर आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारला सवाल

Aprna

भांडारकर संस्थेत तोडफोड करणारे संभाजी ब्रिगेडचे ६८ जण निर्दोष

News Desk

लिंग बदलून नौदलात काम करणाऱ्या तरुणाचा पर्दाफाश

News Desk