HW News Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

BMC Election 2022: 53 ओबीसींसाठी आरक्षित वॉर्ड कोणते?, शिवसेनेच्या दिग्गजांचे वॉर्ड आरक्षित

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (BMC Elections 2022) आज (शुक्रवार, 29 जुलै) पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणासाठीच्या (OBC reservation) आरक्षणाची सोडत काढण्यात आली. या सोडतीत 63 प्रभाग ओबीसीसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. मात्र, या आरक्षण सोडतीत दिग्गज नेत्यांना मोठा झटका बसला आहे. नुकतेच ओबीसी आणि महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण करण्यात आले असून पूर्वीचे सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नागरिकांचा ओबीसी आरक्षण सोडत काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आज ही सोडत जाहीर करण्यात आली आहे. मात्र, यात अनेक दिग्गज नगरसेवकांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे या दिग्गजांना आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुका लढण्यासाठी इतर वॉर्ड शोधावे लागणार आहेत. 236 पैकी 219 प्रभागांसाठी ही आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. यामध्ये एकूण 63 वॉर्ड हे ओबीसींसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. यापैकी 53 वॉर्ड ओबीसींसाठी राखीव असतील. कारण गेल्या तीन वर्षात ओबीसींसाठी कधीही आरक्षण नव्हते.

‘या’ दिग्गजांसाठी धक्का

या आरक्षण सोडतीत शिवसेनेचे नेते आणि मुंबई महापालिकेतील माजी स्थायी समिती सभापती यशवंत जाधव यांनाही झटका बसला आहे. यशवंत जाधव यांचा प्रभाग ओबीसी महिलांसाठी राखीव झाला आहे. तसेच शिवसेनेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा प्रभाग देखील ओबीसी महिलांसाठी राखीव करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादीच्या नेत्या राखी जाधव यांचा 130 हा प्रभाग ओबीसींसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे या नेत्यांना आता निवडणूक लढवण्याची असेल तर दुसऱ्या वॉर्डात जावे लागेल. नाहीतर या नेत्यांना आगामी पालिका निवडणुकीत उभं राहता येणार नाही. दरम्यान, केवळ शिवसेनाच नाही तर इतर पक्षातील नेत्यांना सुद्धा या ओबीसी आरक्षणाचा फटका बसला आहे.

ओबीसी राखीव प्रभाग

ओबीसी आरक्षणासाठी 10 प्रभागांसाठी सोडत काढण्यात आली. त्यात 17, 82, 96, 73, 16, 127, 98, 61, 173, 130 असे प्रभाग आहेत. तसेच मागील तीन वर्षांपासून ज्या प्रभागांमध्ये ओबीसी आरक्षण नव्हते ते प्रभाग 3, 7, 9, 12, 13, 27, 30, 38, 40, 42, 48, 51, 53, 62, 76, 79, 81, 87, 89, 101 202, 203, 217, 218, 222,223, 230, 236 ओबीसीसाठी नियुक्त केले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अभिनेता भरत जाधवची मुख्यमंत्र्यांना ‘ही’ विनंती

News Desk

शिवसेना-भाजपची खरंच युती होणार का? संजय राऊतांनी दिलं ‘हे’ उत्तर!

News Desk

प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण अर्थसंकल्पीय तरतुदीतून करता येणे शक्य असताना सर्वसामान्यांकडून शुल्क का घेत आहे?  

News Desk