मुंबई | कल्याण, बदलापूरसह अंबरनाथ परिसरात आज (२७ जुलै) मध्य रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे वांगणी येथे महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली असून २ फूट पाणी ट्रॅकवर साचले आहे. महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून आतापर्यंत ११७ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आले असून एक्स्प्रेसमध्ये आता ७०० प्रवासी अडकल्याची माहिती मिळाली आहे. एनडीआरएफ प्रवाशांना बचावण्याचे काम युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे. ही एक्स्प्रेस काल (२६ जुलै)पासून १० वाजेपासून अडकली आहे. या ट्रेनमध्ये सुमारे दोन हजार प्रवासी अडकले आहेत.
#Maharashtra: A team of National Disaster Relief Force rescues passengers of Mahalaxmi Express. #Badlapur pic.twitter.com/3dUZdgUWDh
— ANI (@ANI) July 27, 2019
एनडीआरएफच्या ८ बोटी बचावकार्यासाठी रेल्वेजवळ पोहोचल्या आहेत. प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी इंडिया रेफिने बोटी पाण्यात उतरवल्या आहेत. इंडिया रेफिने बचावकार्याचा वेग घेतला असून, जिल्हाधिकाऱ्यांनी या भागात हेलिकॉप्टर पाठवणार असल्याची घोषणा केली आहे. रेल्वे रुळांच्या चारही बाजूला पाणी असल्याने व उल्हास नदीची पाणीपातळी वाढल्याने ही ट्रेन जवळपास दरवाजापर्यंत बुडाली आहे, मात्र प्रवासी सुखरूप आहेत तसेच प्रवाशांसाठी खाद्यपदार्थ आणि इतर जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्या आहेत.
Mahalaxmi Express rescue operation: 8 flood rescue teams from Navy including 3 diving teams mobilised with rescue material, inflatable boats & life jackets. A Seaking Helicopter also sent with divers for deployment in the area as advance assessment party. #Maharashtra pic.twitter.com/qBNyGXefL1
— ANI (@ANI) July 27, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.