मुंबई | पश्चिम रेल्वेच्या अंधेरी येथील गोखले पुलाचा काही भाग कोसळला. पुलाचा काही भाग कोसळल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. गोखले पूल मंगळवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास काही पुलाचा भाग कोसळला आहे. घटनास्थळी अग्निशमन दल आणि एनडीआरएफ पथक श्वानसोबत दाखल झाले आहेत.
या पुलाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या २ जणांना काढण्यात एनडीआरएफ टीमला यश आले असून सहा जण जखमी आहेत. कोसळलेल्या पुलाचा ढिगारा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गोखले पूल हा जवळपास ६० वर्षे जुना असल्याचे बोलले जात आहे.
Part of Road Over Bridge collapsed in #Mumbai's Andheri West: NDRF team, with dog squad, is present at the spot. 2 people have been rescued from under the debris so far. Total 6 injures have been reported. Rescue operation underway. pic.twitter.com/6aI3x0c2bf
— ANI (@ANI) July 3, 2018
अंधेरी रेल्वे स्टेशनच्या ८ आणि ९ या प्लॅटफॉर्मवरील ही घटना आहे. ऐन गर्दीच्या वेळी चाकरम्यांना कार्यालयात पोहचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्ववत येण्यासाठी बराच वेळ लागणार असल्याची माहिती मिळाली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.