HW News Marathi
मुंबई

मध्य रेल्वेचा रविवार विशेष ट्रॅफिक ब्लॉक

मुंबई – लष्कराच्या मदतीने करी रोड स्थानाकात पादचारी पूल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने विशेष ट्रॅफिक ब्लॉक घोषित केला आहे. हा ब्लॉक सकाळी ८ वाजून ३० मिनिटांपासून ६ ते ८ तासांपर्यंत ट्रॅफिक ब्लॉक असणार आहे. या काळात दादर ते साडे तीनवाजेपर्यंत धिम्या मार्गाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनज दरम्यान रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे.

आंबिवली पूलाचे काम पूर्ण झाले तर परळ-एल्फिन्स्टन पूलाची उभारणी झाली आहे. आंबिवली, परळ-एल्फिन्स्टन येथे लष्कराच्या मदतीने पादचारी पूल उभारण्यात आले. करी रोड येथील पादचारी पूल उभारण्यासाठी मध्य रेल्वेने हा ट्रॅफिक ब्लॉक घोषित केला आहे.

रविवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत जलद मार्गावर आठ तासाचा ब्लॉक तर सकाळी साडेनऊ वाजल्यापासून ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत धिम्या मार्गावर असा सहा तासाचा ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकच्या काळात जलद आणि धिम्या या दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द केल्या आहेत. या ब्लॉकचा मेल-एक्स्प्रेस यावर देखील परिणाम होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनासारखाचं आणखी १ विषाणू समाजात आलाय, मुख्यमंत्री कोणत्या विषाणूबद्दल बोलले ?

News Desk

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल

News Desk

वांद्रे येथील झोपडपट्टयांना आग

swarit