HW News Marathi
मुंबई

नेरूळ-उरण उपनगरीय रेल्वेसेवेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

नवी मुंबई | नेरूळ ते उरण रेल्वेमार्गावरील पहिल्या टप्प्यातील उपनगरीय रेल्वेसेवा आज(११ नोव्हेंबर) खारकोपरपर्यंत सुरू झाली. या सेवेचा उद्घाटन सोहळा आज खारकोपर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व रेल्वे व कोळसा मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत पार पडला. मुंबई, नवी मुंबई आणि एमएमआरडीए अंतर्गत येणारा परिसर येथे निर्माण होणाऱ्या वेगवान दळणवळण सुविधांचा फायदा रायगड जिल्ह्यापर्यंत होणार असल्याचे पाहता. हे सर्व क्षेत्र एकत्र केल्यानंतर महामुंबई’ म्हणूनच विचार करावा लागेल. यासाठी शासन विकासाचे नियोजन व प्रयत्न करीत आहे, नवी मुंबईचा विकास पाहता राज्याचे फडणवीस यांनी या सेवेच्या उद्घाटन सोहळ्यावेळी बोलत होते.

तसेच वसई रोड-दिवा-पनवेल-पेण या मार्गावर आता डेमुऐवजी मेमु सर्व्हिस चालवली जाणार आहे. म्हणजे दिवा ते पेण या मार्गावर आधी जिथे डिझेलवर धावणारी गाडी होती. तिथे आता विजेवर चालणारी गाडी धावेल. पनवेल ते पेण या मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. त्याचेही आज लोकार्पण झाले आहे. त्यामुळेच आता मेमु गाडी या मार्गावर चालवली जाणार आहे.

तसेच परळ स्टेशन नवीन प्लॅटफॉर्म, शिवडी,मुंब्रा, भांडूप, परळ, कळवा, घाटकोपर येथे नवीन ओव्हरब्रिज, सर्वच २७३ उपनगरीय रेल्वे स्थानकावरील प्लेटफॉर्मचे उंची ९०० मिमीने वाढवली २३ स्थानकांवर ४१ एक्सलेटर्स, ६ स्थानकांवर १०लिफ्ट, ६ स्थानकांवर नवीन शौचालय, ७७ स्थानकांवर ३१८ एटीव्हीएम सुविधा, ६ स्थानकांवर २०६ सीसीटीव्ही कॅमेरा सुविधा, भिवंडी-नावडे रोड येथील २ नवीन बुकिंग ऑफिसेस, सानपाडा ईएमयू कारशेड येथे १ मेगा वॅट सौर ऊर्जा प्रकल्प या विविध लोकोपयोगी सुविधांचे लोकार्पणही करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आता छत्रपती शिवाजी ‘महाराज’ आंतरराष्ट्रीय विमानतळ

News Desk

मराठा आरक्षणाचे काय झाले? न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

News Desk

कल्याणच्या कृष्णकुंज सोसायटीत झाला विवेकी विचारांचा जागर

News Desk
मुंबई

वसई समुद्रात ‘मॉर्निंग स्टार’ बोट बुडाली, ६ जण बचावले

News Desk

वसई | समुद्र किनाऱ्यापासून जवळपासू ३५ किलोमीटर अंतरावर ‘मॉर्निंग स्टार’ या मच्छिमार बोटीचा अपघात झाला होता. हा अपघात पहाटे साडेपाचच्या सुमारास झाला होता. या बोटीत एकूण सात जण असून त्यापैकी फक्त सहा जणांना बाहेर काढण्यात तटरक्षक दलाला यश आले असून एकाचा शोध सुरू तटरक्षक दलाकडून घेतला जात आहे.

 

मॉर्निंग स्टार बोटीला अपघात झाल्याचे स्थानिक मच्छिमारांच्या लक्ष्यात येताच तातडीने या घटनेची माहिती तटरक्षक दलाला दिली. आणि यानंतर तटरक्षक दलाने काही वेळातच घटनास्थळी दाखल होऊन मच्छिमारांचा शोध घेण्यात आला. या शोध महिमेत तटरक्षक दलाबरोबर स्थानिक मच्छिमार देखील सहभागी झाले होते.

 

 

Related posts

आज देखील ती धावली…   

swarit

महाराष्ट्र दिनी निघणार कामगारांचा आझाद मैदानात एल्गार मार्च

News Desk

३७ वर्षीय अमेरिकन नागरिक असलेल्या महिलेने  २७ व्या माळ्यावरून उडी घेऊन केली आत्महत्या 

News Desk